corona positive sakal
नांदेड

नांदेड : शुक्रवारी जिल्ह्यात चार अहवाल पॉझिटिव्ह

चार रुग्ण कोरोना आजारातून मुक्त; १६ रुग्णांवर उपचार सुरु

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना रुग्णांची संख्या कधी कमी तर कधी जास्त होत आहे. शुक्रवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या ८५० अहवालापैकी चार व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दुसरीकडे दिवसभरात चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सध्या १६ रुग्ण उपचार घेत असून दोन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.(Four reports positive in the district on Friday)

जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ५५० एवढी झाली असून यातील ८७ हजार ८७९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. शुक्रवारी दिवसभरात नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणात तीन तर, नायगाव तालुक्यातील एक असे चार कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. सध्या विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दोन, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील १३ तर खासगी रुग्णालयातील एक असे एकूण १६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.(corona update in Nanded)

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण पॉझिटिव्ह : ९० हजार ५५०

  • एकूण कोरोनामुक्त : ८७ हजार ८७९

  • एकूण मृत्यू : दोन हजार ६५५

  • शुक्रवारी पॉझिटिव्ह : चार

  • शुक्रवारी कोरोनामुक्त : चार

  • शुक्रवारी मृत्यू : शून्य

  • गंभीर रुग्ण : दोन

  • उपचार सुरु : १६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT