यावर्षी जुन्या पुस्तकाचाच घ्यावा लागणार आधार 
नांदेड

मोफत पाठ्यपुस्तके यंदा विलंबाने; जुने पुस्तके जमा करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळेतील ( स्वयं अर्थसहाय्यित शाळा वगळून) मुला- मुलींना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येतात.

विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून मिळणारी मोफत पुस्तके यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उशिराने मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी मागील वर्षीची जुनी पाठ्यपुस्तके शिक्षकांमार्फत शाळेत जमा करावे. असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळेतील ( स्वयं अर्थसहाय्यित शाळा वगळून) मुला- मुलींना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येतात. मागील वर्षी कोरोनाविषाणू प्रादुर्भाव असतानाही विभागाच्या वतीने सर्व मुलांना पुस्तक वाटप करण्यात आले होते. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळेविना पार पडले. पाचवी ते आठवी पर्यंतच्या मुलांना चार महिने शाळास्तरावर शिक्षण घेता आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्व मुलांचे ऑनलाईन शिक्षण चालू असले तरी ऑफलाइन शिक्षणाची संधी काही थोडक्यात मुलांना मिळाली होती.

हेही वाचा - अहिल्यादेवी होळकर जयंती विशेष : " सम्राज्ञी लोकमाता महाराणी "

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या सर्व मुला- मुलींना पुढील वर्गात बढती देण्यात आली. १४ जूनपासून शैक्षणिक वर्षे २०२१- २२ ला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने सर्व शाळांना पूर्वतयारी करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरवर्षी १५ मेपर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलामुलींसाठी देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून दिल्या जात होते. मात्र शैक्षणिक सत्र सुरू होण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक आहेत तरीही पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नाहीत.

कोरोना विषाणूचा संसर्गामुळे यंदा पाठ्यपुस्तकांची छपाई उशिरा सुरू झाल्याची माहिती असून ऑगस्ट २०२१ महिन्याअखेरपर्यंत पुस्तकांची छपाई पूर्ण होऊन त्याचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्ष पाठ्यपुस्तकाविना सुरू करण्याचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. दहाव्या वर्गातील मुलांना पुढच्या वर्गात बढती देऊन निकाल पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक शाळांवर सोपविण्यात आली आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या मुलांचाही निकाल तयार झाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करण्याची उत्सुकता असली तरीही त्यावर कोरोनाचे सावट असणार आहे.

येथे क्लिक करा - पुण्यातील इंजिनिअर्सची कमाल; बंद पडलेल्या व्हेंटिलेटरचा ‘गॅस अ‍ॅनलायझर’वापरून चौघांनी बनवला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

जुनी पुस्तके जमा करण्याचे आवाहन

कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे पाठ्यपुस्तकांची छपाई उशिराने सुरू झाली आहे. सर्व शाळेतील मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत मात्र त्यासाठी थोडा विलंब होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही त्यासाठी सर्व पालकांनी व मुलांनी आपल्याकडील जुनी पाठ्यपुस्तके शिक्षकांच्या मदतीने शाळेत जमा करावेत. शाळा स्तरावर जमा झालेली चांगल्या अवस्थेतील पुस्तके शिक्षकांनी मुलांना वितरित करावे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- दत्तात्रय मठपती, उपशिक्षणाधिकारी.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

CJI BR Gavai यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात १० दलित न्यायाधीशांची नियुक्ती, ओबीसी कीती?

Pune Municipal Corporation Election : नऊ प्रभागांमध्ये महिला राज; निवडणुकीत मते ठरणार निर्णायक, पुण्यात ८३ महिला नगरसेवक निवडले जाणार

Jalna News: जालना हादरलं! दुचाकी वादातून तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Dharashiv Accident: धाराशिवमधील अपघातात तिघे ठार; मोटारीचा टायर फुटून अपघात, ११ जण जखमी

SCROLL FOR NEXT