murder sakal
नांदेड

मैत्रीला काळिमा फासणारी गोष्ट ; मित्रानेच केला मित्राचा खून

एका अल्पवयीन आरोपीला अटक; मृतदेह जाळून हाडे गोदावरीत फेकले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पाच मित्रांनी मिळून आपल्याच एका मित्राचा खून केल्याची घटना नांदेडमध्ये उकडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर त्या मित्राचा मृतदेह परस्पर जाळून टाकून त्याची हाडे गोदावरी पात्रात फेकून देण्यात आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली.

एक महिन्यापासून गायब असलेल्या एका युवकाचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावणाऱ्या पाच मित्रांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापैकी एका अल्पवयीन युवकाला ग्रामीण पोलिसांनी रविवारी (ता.२३) ताब्यात घेतले असून, त्याला बाल निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.

अधिक माहिती अशी की, वजिराबाद पोलिस ठाण्यात २१ जानेवारी रोजी कसतुरीबाई सुलगेकर यांनी माहिती दिली. त्यानुसार त्यांचा नातू सुनील सुरेश सलगेकर (वय २१) हा कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला होता. वजिराबाद पोलिसांनी याबाबत मिसिंगची तक्रार दाखल करून घेतली होती. दरम्यान शनिवारी (ता.२२) रोजी व्यंकटेश राजू सुलगेकर (रा. बंदाघाट रस्ता) यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात जावून दवाब दिला. त्यात म्हटले की, माझा चुलत भाऊ सुनील सुरेश सुलगेकर हा मला दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी भेटला होता. सुनीलचे वडील सुरेश सुलगेकर यांचा २०१८ मध्ये शिवाजीनगर भागात खून झाला. त्याच्या आईचाही मृत्यू झाला आहे. सुनील मोठा झाल्यावर त्याला वाईट व्यसनाची सवय लागली. त्याचे मित्र अनिरुद्ध आचेवार, सोनू, अभिजित पुजारी, अनिल पवार हे आहेत.

यापैकी दोघांसोबत सुनीलचे संबंध बिघडले होते. त्यातूनच त्यांचे एकमेकांशी वाद होत गेले. आणि त्यातूनच पाच जणांनी मिळून १८ डिसेंबर रोजी कौठा परिसरात सुनील सुलगेकरचा खून केला होता. तसेच त्याचा मृतदेह जाळून त्याची हाडे गोदावरी पात्रात टाकून दिले.या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या सूचनेवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील यांच्याकडे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: गर्भपातासाठी पतीची परवानगी नको! उच्च न्यायालयाचे एकाच दिवशी दोन मोठे ऐतिहासिक निर्णय, महिलांना मोठा दिलासा

Nagpur News: नागपूरात बोगस बांधकाम कामगार नोंदणी; दलालांचे धाबे दणाणले, नागपूर, वर्धा जिल्ह्यात कारवाई!

Shoumika Mahadik : शौमिका महाडिक जिल्हा परिषद निवडणूक लढवणार की नाही, ४ शब्दात कंडका पाडला...

CM Devendra Fadnavis : मुंबईत जन्माला येऊन तुम्ही काय केले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना सवाल

Prakash Ambedkar : 'भाजप सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष, अजितदादा-एकनाथ शिंदे त्यांच्या तालावर नाचताहेत'; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT