दिव्यांगाला दिली मित्राने भेट 
नांदेड

मैत्रीचे नाते : दिव्यांग धावला दिव्यांग मित्राच्या मदतीला; दिली स्वयंचलीत रिक्षा

अर्धापुर शहरातील शिनगारे हे दिव्यांग असून वेगवेगळे व्यवसाय करुन स्वाभिमानाने आपला उदरनिर्वाह करतात.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : मैत्रीचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेगळेच असते. आपल्या मित्राला संकटात, सुख, दु: खात सहभागी होवून मदतीला धावून जातो तो मित्र. सम दुः खींना एकमेकांच्या अडचणी चांगल्या समजत असल्यामुळे असे मित्र कोणत्याही परिस्थितीत मदतीला धावून जातात. त्याचे प्रत्यय अर्धापूर शहरात आला. मैत्री दिनाचे औचित्य साधून एका दिव्यांग मित्राने आपल्या दिव्यांग मित्राला स्वयंचलित तीन चाकी रिक्षा भेट देवुन एक अदर्श आत्माराम राजेगोरे यांनी निर्माण केला. एक आगळा- वेगळा मैत्रीदिन साजरा केल्याने त्याचे कौतुक होत आहे.

अर्धापुर शहरातील शिनगारे हे दिव्यांग असून वेगवेगळे व्यवसाय करुन स्वाभिमानाने आपला उदरनिर्वाह करतात. शहरातील विविध कार्यक्रमांची माहिती देणे, शासकीय योजनांची माहीती देणे आदी कामे करतात. मागील अनेक वर्षांपासून हाताने तीनचाकी रिक्षा चलवतात. आपला व्यवसाय करतात. वाढत्या वयामुळे हाताने रिक्षा चालून व्यवसाय करणे आवघड होत होते. स्वयंचलित आॅटोरिक्षा घेणे परवडत नव्हते.

हेही वाचा - कुरुळा दूरक्षेत्र पोलिस चौकीचा लाचखोर सहाय्यक फौजदार सुभाष चोपडे याच्यासह एका खासगी व्यक्ती लाचेच्या जाळ्यात.

आॅटोरिक्षा मिळावी यासाठी श्रावण नवले यांनी अनेक बड्या नेत्यांची उंबरठे झिजवले. निवेदने दिले त्याचा काही एक फायदा झाला नाही. त्यांनी आपली व्यथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांच्याकडे मांडली. त्यांनी भाजप अपंग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे यांनी माहिती देवून आॅटोरिक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी अनुदानचे अपंगांना साहित्य वाटप केले होते. या योजनेत तीनचाकी रिक्षा दिव्यांग आत्मराम राजेगोरे यांना मिळाली होती. आपल्याला मिळालेली तिनचाकी रिक्षा आपल्यापेक्षा मित्राला जास्त गरज आहे ही जाणीव ठेवून आत्मराम राजेगोरे यांनी स्वतः ला अडचण असताना त्यांनी कोणताही विचार न करता आपली तीनचाकी रिक्षा श्रावण नवले यांना दिली व आपल्या मैत्रीचे नाते निभावले.

येथे क्लिक करा - घटनास्थळावरुन पोलिसांनी जुगाराचे साहित्य व आठ हजार ४५० रोख रक्कमेसह नऊ दुचाकी असा दोन लाख १८ हजार ४५० रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.

मला दिव्यांग कल्याण योजनेतून स्वयंचलित तीनचाकी आॅटोरिक्षा मिळाली होती. माझ्यापेक्षा माझा मित्र श्रावण नवले याला गरज होती. त्यामुळे मी तीनचाकी आॅटोरिक्षा त्याला दिली. त्याच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरणार आहे. मित्राला सहकार्य करण्याची संधी मिळाली याचा खूप मोठा आनंद होत आहे अशा भावना आत्मराम राजेगोरे यांनी व्यक्त केल्या.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin: पुतीन यांचे 'हे' चार मित्र, ज्यांच्यामुळे पाश्चिमात्य देशांचं वर्चस्व संपलं; चीनमधून दिला संदेश

Mumbai News: मुंबईत ईद-ए-मिलादच्या मिरवणुकासाठी रस्ते वाहतूक बदल, पाहा पर्यायी मार्ग

Ravindra Jadeja च्या पत्नीनेही दाखवलं खेळाचं कौशल्य; लहान मुलांसोबत खेळली कबड्डी अन् रस्सीखेच; पाहा Video

Thane Crime: तलाठी कार्यालय चोरी प्रकरण! तपासात धक्कादायक खुलासा उघड; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates: दौंड रेल्वे स्थानकावर प्रवाशाला लुटले

SCROLL FOR NEXT