fund from state government for development of Nanded Ashok Chavan sakal
नांदेड

नांदेडच्या विकासासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी ;अशोक चव्हाण

पालकमंत्री अशोक चव्हाण : ‘माझं घर हरित घर’ उपक्रमातील विजेत्यांना बक्षिसांचे वाटपc

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड महानगराच्या विकासाला ज्या मोठ्या निधीची अत्यावश्यकता होती तो निधी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांपूर्वी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून अनेक विकास कामे आपल्याला करता आली. आज तब्बल १० ते १२ वर्षानंतरचा काळ लोटल्यानंतर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र शासनाकडून सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी नांदेड महानगराच्या विकासासाठी उपलब्ध करून घेता आला. या निधीतून वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या रस्त्यांसह इतर विकास कामांची पूर्तता लवकर करू, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “माझं घर-हरित घर” या उपक्रमांच्या बक्षिस वितरण सोहळ्यात ते शनिवारी (ता.१९) बोलत होते. याप्रसंगी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार डी.पी.सावंत, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार, किशोर स्वामी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले की, कुठल्याही शहराची ओळख ही तेथील रस्त्यावरून होत असते. ज्या शहरातील रस्ते चांगले असतात तेथे विकासही चांगला होतो, ही बाब लक्षात घेवून नांदेड शहरात सहा पदरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. नांदेड शहरातील डॉ. शंकराराव चव्हाण चौक-माळटेकडी गुरूव्दारा-नमस्कार चौक-एमजीएम कॉलेज संरक्षण भिंत-महाराणा प्रताप चौक-बाफना टी पॉईंट या रस्त्याचा विकासात अंर्तभाव आहे. याचबरोबर बसस्थानक-रेल्वेस्टेशन ते बाफना टी पॉईंट पर्यंत रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगमस्थळांची सुधारणा या पहिल्या टप्प्यातील कामाची आपण सुरुवात केली आहे. जवळपास ६५ किमी लांबीची रस्ते आपण नांदेड महानगरात हाती घेऊन पूर्ण करीत असल्याचेही श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेतील विजेते

“माझं घर-हरित घर” स्पर्धेत २१ हजार रुपयांचे प्रथम बक्षिस जुगल किशोर जाखोटिया, कौठा यांनी पटकावले आहे. तर द्वितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे बक्षिस सरोज मोदानी अरविंदनगर व शांताबाई क्षीरसागर कैलासनगर यांना विभागून देण्यात आले. दहा हजार रुपयांचे तृतीय बक्षिस सारिका शिराढोणकर उदयनगर आणि नितीन कऊटकर गांधीनगर यांना विभागून दिले.

शहराच्या सौंदर्यीकरणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहेत. नागरिकांनीही आता अधिक सकारात्मक लोकसहभाग घेऊन पर्यावरण संतुलनाच्या या चळवळीत अधिकाधिक कृतीशील सहभाग घ्यावा.

- अशोक चव्हाण, पालकमंत्री नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT