महापौर जयश्री पावडे; मुख्याध्यापक, शिक्षकांसोबत बैठक sakal
नांदेड

नांदेड : महापालिकेच्या शाळांनाचांगल्या सुविधा देणार

महापौर जयश्री पावडे; मुख्याध्यापक, शिक्षकांसोबत बैठक

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना महामारीच्या काळात प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या महापालिकेच्या शाळांना प्रशासकीय स्तरावरील सर्व मदत करणार. तसेच या शाळांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, प्रत्येक शाळा डिजीटल होण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन महापौर जयश्री निलेश पावडे यांनी मंगळवारी (ता. १४) दिले.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची आढावा बैठक महापौर पावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता पाटील डक, शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर पावडे यांनी कोरोनानंतर सुरु झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीच्या माध्यमातून दिलेल्या प्रतिसादाची माहिती घेतली.

सर्व शाळांमधील विद्यार्थी संख्या, शिक्षकांची संख्या, शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधां याबाबत माहिती घेतानाच सर्व शिक्षकांना सकारात्मक ईच्छाशक्ती ठेवून अधिक चांगल्या पध्दतीने अध्यापनाचे काम करण्याचे सुचित केले. अशा पद्धतीने काम केल्यास विद्यार्थी शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढीस मदत होईल. असे त्या म्हणाल्या.

शाळांमध्ये प्रशासकीय सुविधांबाबतीत येत असलेल्या अडचणी कळविण्याचे सुचित केले व त्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासित केले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी संबंधित शाळेच्या परिसरातील पालकांशी संपर्क करुन विद्यार्थी संख्या वाढीवर भर द्यावा, अशा सूचनाही महापौरांनी केल्या. महापालिकेच्या सर्व शाळा डिजीटल करण्यासाठी डिजीटल माध्यमातून अध्यापनाचे काम करण्याकरीता सुचना जाणून घेतल्या व डिजीटल शाळा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी येत्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केल्या जाणा-या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजनाची माहिती देण्याची सुचना केली. या बैठकीत मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठीही महापौर पावडे यांनी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT