file photo 
नांदेड

चांगली बातमी : 46 तलाठ्यांना लवकरच सज्जांची जबाबदारी- जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यातील सर्वच विभागाची भरती प्रक्रिया ठप्प झाली होती. नांदेड जिल्ह्यात तलाठी पदासाठी परिक्षा घेऊन त्यांची निवड यादी लावली होती. मात्र त्यांना कोरोनामुळे नियुक्तपत्र देण्यात आले नव्हते. अखेर कोरोनाची साखळी कमी होताच वरिष्ठ कार्यालायाच्या सुचनेवरुन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी जिल्ह्यातील ४६ तलाठ्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच आता या नवनियुक्त तलाठ्यांवर सज्जाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व तलाठ्यांना शेवटी न्याय मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावारण पसरले आहे. 

सन 2019 मधील पात्र उमेदवारांना मंगळवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नियुक्ती आदेश दिले आहेत. या आदेशानंतर वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या या तलाठ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. जिल्ह्यातील तलाठी पदासाठी 2019 मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली होती. दोन जुलै 2019 ते 26 जुलै 2019 या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण झाली होती. या परीक्षेचा निकाल डिसेंबर 2019 मध्ये लागला होता. मूळ कागदपत्रांची तपासणीअंती जिल्हा निवड समितीची बैठक घेऊन चार जुलै रोजी तलाठी पदाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

मात्र कोरोना संकटात राज्याच्या वित्त विभागाने कोणत्याही नव्या भरती करु नयेत असे आदेश दिले होते. त्यामुळे या निवड यादीला ब्रेक लागला होता. मात्र जिल्ह्यातील तलाठी निवड प्रक्रिया ही कोरोना संकटापूर्वी पार पडली होती. त्यामुळे या भरतीला मंजुरी द्यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्यानंतर नियुक्ती आदेश देण्यास मंजुरी मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी या तलाठ्यांचे नियुक्ती आदेश दिले आहे. 

आदेशात सदर तलाठ्यांची नियुक्ती ही उपविभागीय अधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. या आदेशांमध्ये खुल्या प्रवर्गातील पंधरा उमेदवारांसह इतर प्रवर्गातील अशा एकूण 33 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्याच वेळी पेसाअंतर्गत निवडीचा प्रवर्ग समांतर आरक्षणातील तेरा उमेदवारांना ही आदेश देण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात कोरोना संकटामुळे तलाठ्यांच्या नियुक्तीबाबत आदेश लाभले होते. आता जिल्हाधिकारी यांनी याबाबत आदेश काढल्यामुळे तलाठी पदी नियुक्त झालेल्या तलाठ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हे तलाठी आता लवकरच आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT