भालकी कर्नाटक 
नांदेड

चांगली बातमी : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी भालकी हिरेमठ संस्थानचा पुढाकार

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी हिरेमठ संस्थानचे स्वामीजी हे महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात महात्मा बसवण्णा आणि लिंगायत धर्म साहित्य प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक कार्य मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

विठ्ठल चंदनकर

बिलोली ( जिल्हा नांदेड ) : देशभरात कोरोना (Corona) सांसर्गिक रोगाने थैमान घातले असून या रोगाचा संसर्ग होऊन ज्या मुलांचे आई- वडील (Parents) दोघांचेही निधन झाले आहे. अशा अनाथ मुला- मुलींना विनामूल्य शिक्षण, निवास व्यवस्था करुन त्यांना स्वावलंबी होण्यापर्यंतची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी (Karnatak hiremath mahaswami) येथील हिरेमठ संस्थानचे पीठाधिपती परमपूज्य श्री डाॅ बसवलिंग पट्टद्देवरु महास्वामी यांनी घेतली आहे.

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी हिरेमठ संस्थानचे स्वामीजी हे महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात महात्मा बसवण्णा आणि लिंगायत धर्म साहित्य प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक कार्य मोठ्या प्रमाणात करीत आहेत. याशिवाय त्यांनी आजवर असंख्य अनाथ मुलांचे संगोपन केले आहे. गरीब व होतकरु मुलांना विनामूल्य शिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था केली असून हजारो मुलांचे जीवन फुलविले आहे.

हेही वाचा - काँग्रेसच्या एकजुटीचा महाडिकांना शह: तीन दशकांच्या एकहाती सत्तेला लावला सुरूंग

सध्या देशातील सर्वच राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक मुलांचे आई- वडील दगावली आहेत. आई- वडिलांचे छत्र हरपल्यामुळे असे अनाथ बालक बेघर झाले आहेत. देशातील कोणत्याही राज्यातील अनाथ बालकांना सक्षम करुन त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी हिरेमठ संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

याविषयी देण्यात आलेल्या प्रसिद्धी पञकात हिरेमठ संस्थानच्या स्वामीजींनी देशभरात कोरोना रोगाने थैमान घातले असून, सर्वञ भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोक मरण पावत आहेत. कामगार, शेतमजुर, कष्टकरी आणि लहानसान व्यवसायांवर अवलंबून असलेले लाखो कुटुंब अक्षरश: हवालदिल झाले असल्याचे नमूद केले आहे. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने अनेक घरातील कर्ते आईवडील निधन पावले आहेत. त्यामुळे त्यांची मुले अनाथ झाल्याचे चित्र प्रकर्षाने पुढे आले आहे. अशा मुलांचे भविष्य अंधकारमय होऊ नये म्हणून अशा मुलांचे पूर्णत: संगोपन करण्याची जबाबदारी भालकी हिरेमठ संस्थानच्या पूज्य श्री डाॅ बसवलिंग पट्टद्देवरु महास्वामीजी स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. समाजातील कोणत्याही जातीधर्मातील अनाथ मुलांना हिरेमठ संस्थानात सामावून घेतल्या जाणार आहे. अधिक माहितीसाठी भालकी मठाचे नूतन मठाधिपती पूज्य श्री गुरुबसव पट्टद्देवरू स्वामीजी ९६०६०६९३३३, मठाचे व्यवस्थापक श्री. मोहन रेड्डी ७३५३३०४५०२ आणि महाराष्ट्र बसव परिषदेचे संचालक श्री. राजू जुबरे ८९०४६३८९०८ यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन त्यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT