file photo 
नांदेड

गुड न्यूज : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसिस सुरु

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात नॉन कोवीड रुग्णांसाठी डायलिसीस मशिन कार्यान्वित करण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते या मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एस. चव्हाण, प्राध्यापक व औषधवैद्यक विभागप्रमुख डॉ. भुरके, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्रीमती राठोड, कपिल मोरे, डॉ. कापसे, नियोजन अधिकारी डोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. किडनी आजाराच्या रुग्णांना या मशीनचा मोठा फायदा होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आणखी चार ते पाच डायलिसीस मशिन उपलब्ध करुन घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून त्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉक्टर देशमुख यांनी सांगितले.

डायलिसीस मशिनसाठी रुग्णालयात स्वतंत्र विभागाची रचना करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. खासगी रुग्णालयात डायलिसीस मशिनसाठी रुग्णांना मोठ्याप्रमाणावर खर्चाला सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातून येणाऱ्या बहुतांश रुग्णांना पैशाअभावी डायलिसीस मशिनची सेवा मिळू शकत नाही. परंतु शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना आवश्यकतेनुसार ही सुविधा उपलब्ध झाली आहे. गरजेनुसार नेफरोलॉजिस्ट याचा अभिप्राय घ्यायचे असेल तर त्यांना बोलावून रुग्णावर उपचार केले जातील तसेच याबाबतचा खर्च रुग्णालयात प्रशासनामार्फत केला जाणार असून रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Toll Rule India : वाहनचालकांसाठी खुशखबर ! महामार्गावर टोल नियमात मोठा बदल, खर्च होणार कमी; काय आहे सरकारचा प्लॅन?

कमळी शोधणार सरोजच्या मृत्यूचं सत्य ते जय वाचवणार शरूचा जीव; या आठवड्यात तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये काय घडणार?

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

दारूवर तुमचा खर्च, सरकारची मात्र हजारो कोटींची कमाई! अवघ्या 2 महिन्यांत या राज्याने कमावले 10,500 कोटी; महाराष्ट्राचा आकडा किती?

Sachin Ahir: सचिन अहिरांचा उपसभापतीपदासाठी अर्ज; ठाकरे गटाला धक्का, शिंदेसेनेत जाणार, मुंबईच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT