file photo 
नांदेड

Good news:नांदेडला डीएनए आणि सायबर चाचणी शक्य- पालकमंत्री अशोक चव्हाण

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी रखडलेल्या कामांना वेगाने चालना दिली असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत आता डीएनए चाचणी आणि सायबर (संगणक) गुन्हे विभाग सुरू होणार आहे.

सदरहू प्रयोगशाळेत डीएनए चाचणी तसेच सायबर गुन्हे विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे रखडलेला होता. हे दोन्ही विभाग सुरु करण्यासाठी सुमारे पाच हजार चौरस वर्ग फूट जागेची आवश्यकता होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करुन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार  

डीएनए चाचणी विभाग आणि संगणक गुन्हे विभागासाठी जागा देण्याचा प्रस्ताव शासनाकडून मान्य झाल्याने लवकरच हे दोन्ही विभाग कार्यरत होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नांदेडच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत सुरु होणाऱ्या या दोन्ही विभागांमुळे संबंधित कार्यवाही गतीमानतेने होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले असून, या विभागांसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत. 

मागील सहा महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू 

जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी पायाभूत सुविधांबाबतचे रखडलेले अनेक निर्णय वेगाने मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. प्रलंबित प्रस्तावांच्या पूर्ततेसाठी कार्यवाहीला वेग देण्यात आला असून, नव्या इमारतींची उभारणी तसेच जिल्ह्यात नवी कार्यालये, नवी पदे निर्माण करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नांदेड येथील न्यायालयाची इमारत, कौटुंबिक न्यायालयाला जागा उपलब्ध करून देणे यासह अनेक विषय पालकमंत्र्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत. त्याच प्रयत्नांची फलश्रुती म्हणून आता डीएनए चाचणी व संगणक गुन्हे विभागासाठीही जागा उपलब्ध झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Israel: ट्रम्प-नेतान्याहूंमध्ये खडाजंगी? युद्धाच्या धोरणावरून मतभेद; अमेरिकेतील माध्यमांचे वृत्त

Bakrid Sacrifice Rule: गायीची कुर्बानी अनिवार्य नाही, बकरीदपूर्वी हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; धार्मिक परंपरेबाबत स्पष्ट भूमिका

ITI Admissions 2026: राज्यातील शासकीय-खासगी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; १,५७,६६४ जागांसाठी संधी

GT vs CSK Live: साई सुदर्शनचे शतक हुकले! शुभमन, बटलरनेही झोडले! चेन्नईसमोर मोठं लक्ष्य, संजू सॅमसन फलंदाजीला येणार का?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या आता फक्त विनंती बदल्या! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनाला यश

SCROLL FOR NEXT