file photo 
नांदेड

चांगली बातमी: शिधापत्रिकाधारकांना तांदुळ, अख्ख्या हरभऱ्याचे मोफत वितरण

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत राशनकार्ड नसलेल्यांना तांदुळ व अख्ख्या हरभऱ्याचे मोफत वितरण सुरु आहे. शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विशिष्ट आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता, लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मे व जून २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या मजुरांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ व प्रति कुटुंब एक किलो अख्खा हरभरा लाभार्थ्यांना वाटप सुरु आहे.

जिल्ह्यात या योजनेत दोन लाख २४ हजार ५५८ लाभार्थी 

या योजनेंतर्गत जूनमध्ये प्रत्येक कुटुंबाला मे व जून या दोन महिन्याची (प्रति महिना एक किलो प्रमाणे) दोन किलो मोफत अख्खा हरभरा व एका व्यक्तीस १० किलो तांदूळ मोफत (प्रति लाभार्थी प्रती महिना पाच किलो प्रमाणे) मे व जुन या दोन महिन्याचे एकत्रित वाटप सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेत दोन लाख २४ हजार ५५८ लाभार्थी असून त्यापैकी तांदुळ ७८. ०६५ मे. टन व अख्खा चना ३. १८६ मे. टन. आतापर्यंत वाटप झाला असून शिल्लक लाभार्थ्यांना आपल्या रास्त भाव दुकानात जाऊन अन्न धान्य प्राप्त करुन घ्यावे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमीत धान्याबरोबर प्रति सदस्य प्रतिमाह पाच किलो तांदूळ मोफत व मे, जूनची प्रति कुटुंब तुरदाळ किंवा चनादाळ एक किलो याप्रमाणे दोन महिन्याची दोन किलो दाळ मोफत जूनमध्ये वितरीत करण्यात येत आहे. संबंधित तहसिलदार व सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना सदर धान्य वाटप करण्याबाबत सूचना दिली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी नमूद केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT