file photo 
नांदेड

गुड न्यूज : नांदेड- अमृतसर विमानसेवा दहा नोव्हेंबरपासून

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यात नांदेडची विमानसेवा बंद होती. परंतु हळूहळू देशांतर्गत ही सेवा सुरु झाल्याने ता. १० नोव्हेंबरपासून नांदेड- अमृतसर- नांदेड अशी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एअर इंडियाचे नांदेड स्टेशन मॅनेजर श्री. जोशी यांनी दिली. ही सेवा आठवड्यातील तीन दिवस चालणार असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

नांदेडच्या जनतेसाठी तसेच देश- विदेशातून येणाऱ्‍या शीख यात्रेकरूंसाठी एअर इंडियाच्या वतीने चांगली बातमी असून येत्या ता. १० नोव्हेंबरपासून नांदेड- अमृतसर विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे. ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू राहणार आहे. यासाठी एअर इंडियाने तिकिटांची बुकिंग सुरू केली आहे. येथील जगप्रसिद्ध हजुर साहेब सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी देश- विदेशातून हजारो भाविक येत असतात. परंतु कोरोना संसर्गामुळे केंद्र सरकारने देशभरातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यापासून नांदेड- अमृतसर विमानसेवा बंद होती. 

मंगळवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस

आता टप्प्याटप्प्याने देशांतर्गत विमान सेवेला प्रारंभ होत असून एअर इंडियाने येत्या ता. १० नोव्हेंबरपासून नांदेड- अमृतसर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे. अमृतसरहून सकाळी साडेअकरा वाजता एअर इंडियाचे विमान नांदेडकडे उड्डान भरेल. दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी हे विमान नांदेड विमानतळावर उतरेल. ज्या दिवशी विमान नांदेड पोहोचेल त्याच दिवशी दुपारी तीन वाजता हे विमान अमृतसरकडे परत उड्डाण करेल व सायंकाळी साडेपाच वाजता अमृतसरला पोहोचेल. दीपावली सण व अन्य उत्वसासाठी नांदेडला येणारे व जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विमानसेवा सुरु होत असल्याने प्रवाशांमधून आनंदाचे वातावरण आहे.  

सचखंड गुरुद्वाराच्या भाविकांसाठी संधी 

शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील हजारो शिख भाविकासंह अन्य धर्मीय येत असतात. या भाविकांसाठी विमानसेवा महत्वाची ठरणार आहे. तसेच दिल्लीला जाणाऱ्या लोकप्रतिधीलाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ऐन दिवाळीत एअर इंडियाने बंद केलेली सेवा सुरु होत असल्याने या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. जोशी यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT