file photo 
नांदेड

Good News:अर्धापूर तालुक्यातील दोन युवा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने राज्यातील  प्रयोगशील व प्रगतिशील शेतकयांना पुरस्कार जाहीर केले. सेंद्रिय शेतीसाठीचा कृषिभूषण 2019 हा या पुरस्कारासाठी मालेगाव येथील सेंद्रिय व योगिक शेती करणारे भगवान इंगोले यांची निवड झाली आहे. रासायनिक खते व औषधांचा वापर न करता शेतीला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या निविष्ठा आपल्याच शेतावर करुन चांगले उत्पादन काढता येते ही भगवान इंगोले यांनी सिध्द केले. त्यांच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन सेंद्रिय शेतीचा कृषिभूषण पुरस्कार जाहीर केल्याने शेतकरी वर्गातून त्यांचे स्वागत होत आहे. तसेच धामदरी येथील युवा शेतकरी दत्तात्रय कदम यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला. या दोन्ही युवा शेतकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेले २०१८ व २०१९ सालचे शेतकऱ्यांचे पुरस्कार कृषी विभागाने ता. ३१ मार्च रोजी जाहीर केले. अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कारासाठी मालेगाव तालुका अर्धापूर येथील सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते भगवान इंगोले यांची निवड झाली. गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खते व औषधांचा वापर पूर्णपणे बंद करुन भगवान इंगोले यांनी आपल्या शेतालाच एक प्रकारची प्रयोगशाळा तयार केली शेतीसाठी लागणार्या सर्व प्रकारचे निविष्ठा, औषधी, बियाणे, खते तयार करुन चांगले उत्पादन काढले व शेतीचा पोतही सुधारला, शेती व नागरिकांच्या आरोग्यासाठी विषमुक्त अन्न ही काळाची गरज आहे. याबाबत भगवान इंगोले यांनी केलेला प्रचार व प्रसारही वाखाणण्याजोगा असल्यानेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांची कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड केली. तसेच धामदरी येथील युवा शेतकरी दत्तात्रय नामदेव कदम यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली त्यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जिल्हा कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळेच शक्य भगवान इंगोले  

जिल्हा कृषी अधीक्षक शिवशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून आम्ही एकत्रित काम करीत आहोत. कृषी विभागाचे वेळोवळी मार्गदर्शन यामुळे शेतकऱ्यांना खूप मोलाचे सहकार्य होत आहे. आम्हाला मिळालेल्या पुरस्काराचे मानकरी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आहेत अशी प्रतिक्रिया भगवान इंगोले यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT