नांदेड जिल्ह्यातील शिवनगाव रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरून घसरली, मनमाड - हैद्राबाद रेल्वेमार्ग बंद झाला असून दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  
नांदेड

नांदेडमध्ये मालगाडी रुळावरुन घसरली, मनमाड-हैदराबाद रेल्वेमार्ग बंद

गंगाधर डांगे

मुदखेड (जि.नांदेड) : नांदेड-निजामाबाद दरम्यान असलेल्या शिवनगाव रेल्वेस्थानक दरम्यान निजामाबाद येथून पूर्णाकडे जाणारी मालगाडीच्या चाकांची तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे रुळावरून मालगाडीचे डब्बे घसरले (Nanded Railway Updates) आहेत. यामुळे नांदेड-हैदराबाद रेल्वेमार्ग काही तासासाठी बंद पडला आहे. दक्षिण-मध्य रेल्वे विभागातील शिवनगाव दक्षिण-मध्य रेल्वे विभाग नांदेड (South-Central Railway) ते निजामाबाद आणि मुदखेड रेल्वे जंक्शनपासून (Mudkhed) सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. आज गुरुवारी (ता.२३) सकाळी ६:५५ वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानकावर निजामाबादहून पूर्णाकडे जाणाऱ्या मालगाडीच्या वॅगनची चाके तांत्रिक अपघातामुळे थांबली व रुळावरुन घसरली होती.

सदरील घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच घटनास्थळावर रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे अभियंते व कर्मचारी घटनास्थळावर आले असुन युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम चालु आहे. लवकरच दुरुस्ती होऊन रेल्वेमार्ग मोकळा होऊन दैनंदिन रेल्वे गाड्यांची वाहतुक करण्यासाठी रेल्वे मार्ग चालु होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT