file photo 
नांदेड

सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध- उद्धव ठाकरे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शिवसेना दसरा मेळाव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. २७) रात्री दहा वाजता राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांशी आॅनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात, कोवीड, विकास कामे आणि पक्ष संघटनाबाबत सविस्त मार्गदर्शन केले. यावेळी एकहाती सत्ता आणण्यासाठी सर्वांनी पक्ष संघटना बांधणीचे काम करा असा आदेश दिला. एवढेच नाही तर सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. 
 
मंगळवारी (ता. २७) रात्री दहा वाजता शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांशी अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात, कोविड-19 ची सध्याची जिल्हानिहाय परिस्थिती, संघटन बांधणी, विकासकामे या संबंधी आढावा बैठक घेतली. तसेच शेतकऱ्यांनी कसल्याही प्रकारची चिंता करू नये सरकार व शिवसेना आपल्या पाठीशी सदैव उभी आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध राहील असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले.

कोरोनाची सध्यस्थिती नियंत्रणात

या संवादामध्ये जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील अतिष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली मोठी हाणी तसेच कोरोनाची सध्यस्थिती नियंत्रणात असून जिल्हा प्रशासन त्यासाठी काटेकोरपणे नियोजन करत आहे. एकंदरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आम्ही जिल्हास्तरावर कृषी व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून असल्याचे श्री. कोकाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. तसेच नांदेड दक्षिणचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर आणि उमेश मुंडे यांनीही या संवादमध्ये सहभाग नोंदवून आपले मत व्यक्त केले. 

एकहाती सत्ता आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावे

पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या भविष्यात पूर्ण करु व पक्ष वाढीसाठी सतत कार्यरत राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि आनंद बोंढारकर यांनी पक्षप्रमुखांना शब्द दिला. शिवसेना दसरा मेळ्याव्यानंतर राज्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. सध्या सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेची ताकद राज्यात कमी पडू नये व एकहाती सत्ता आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT