राज्यपाल कोश्यारी e sakal
नांदेड

मैं खुश हुआ,म्हणत राज्यपाल कोश्यारींनी छायाचित्रासाठी दिली पोझ

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज गुरुवारी (ता.पाच) नांदेडच्या (Nanded) दौऱ्यावर आहेत. येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील (Swami Ramanand Thirth Marathwada University) जलपुनर्भरण प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर, मैं खुश हुआ!, असे म्हणत श्री.कोश्यारी यांनी छायाचित्रकारांना आनंदी मुद्रेत पोझ दिली. विविध विकास कामांची चित्रफीत दाखवण्यासाठी (Governor Bhagat Singh Koshyari's Nanded Visit) विद्यापीठाने तयारी केली होती. पण राज्यपालांनी ते नंतर दाखवले तरी चालले असे म्हणाले. श्री कोश्यारी हे गणित संकुलाकडे गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी व कुलगुरु यांची धावपळ उडाल्याची चर्चा ऐकायला मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, सुभाषचंद्र बोस हे माझ्यासाठी राम, कृष्ण या दैवताप्रमाणे आहेत. या महापुरुषांच्या बलिदानाचा आज विसर पडत चालल्याची, खंत श्री. कोश्यारी यांनी विद्यापीठातील कार्यक्रमात व्यक्त केली. आपल्या लोकांमध्ये मिसळून राहायला आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. यातून नवीन गोष्टी शिकायला मिळते असे ते म्हणाले. गुरु गोविंदसिंगजी यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या नांदेड नगरीत येण्याची इच्छा होती. पूर्ण झाल्याचा आनंद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT