नांदेड

महाराष्ट्र दिना निमित्ताने नांदेड सीटू कार्यालयात शहिद क्रांतिकारकांना अभिवादन !

एक मे दिनानिमित्ताने सीटू कार्यालयात शहीद स्मारकास अभिवादन करून महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. कोविड- १९ काळात निधन झालेल्या सर्व ज्ञात- अज्ञात निरपराध लोकांना भावपूर्ण आदरांजली वाहून शहीद क्रांतिकारी वीर जवानांना अभिवादन करण्यात आले.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : एक मे दिनानिमित्ताने सीटू कार्यालयात शहीद स्मारकास अभिवादन करून महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. कोविड- १९ काळात निधन झालेल्या सर्व ज्ञात- अज्ञात निरपराध लोकांना भावपूर्ण आदरांजली वाहून शहीद क्रांतिकारी वीर जवानांना अभिवादन करण्यात आले.

तसेच सीटू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन देऊन राज्य, केंद्र व स्थानिक पातळीवरील मागण्याचे निवेदन देण्यात आले असल्याचे सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

हेही वाचा - ३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेकडे भागभांडवल व निधी २२२ कोटी असून १०८८ कोटी ९५ लाखाच्या ठेवी आहेत.

आयकर न भरणा-या प्रत्येक व्यक्तीस दरमहा किमान सात हजार ५०० रूपये सरकारने केरळच्या धर्तीवर सुरू करावेत. रेशन मोफत देऊन त्यामध्ये मीठ, मीरची, गॕस, गहू, तांदूळ, डाळीसह इतर १६ जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करावा. आशा व गट प्रवर्तक ताईंना कोवीड भत्ता स्वरूपात प्रतिदिन ३०० रूपये प्रोत्साहन भत्ता सुरू करावा. नांदेड रेल्वे स्टेशन सफाईदार कामगारांच्या ॲटॉसीटी प्रकरणातील मुख्य आरोपी आर. मंगाचार्यलू आणि एस.के.वल्ली यांचे एफआयआर मधील नावे दोषारोप पत्रात समाविष्ट करून तत्कालीन तपास अधिकारी उप विभागीय पोलिस अधिकारी नांदेड शहर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. नांदेड स्वारातीम विद्यापीठातील टेंडर समाप्त झालेल्या वादग्रस्त सीआयएसबी व गोदावरी एन्टरप्रायजेस सफाई कामगार पुरवठा करणाऱ्या कंपनीस काळ्या यादीत टाकून तातडीने सर्व सफाई कामगारांना कामगार कायदा कलम दहा प्रमाणे कायम करावे. श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. या प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सीटू जिल्हा समितीच्या वतीने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत आपल्या कार्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सीटू जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार, जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. शेख मगदूम पाशा, कॉ. दत्तोपंत इंगळे, कॉ. लत्ता गायकवाड, कॉ. छायाताई निळकंठे आदींची होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT