पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला नांदेडचा आढावा 
नांदेड

पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला नांदेडचा आढावा  

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजी करणारी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षात घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. चार आॅगस्ट) दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करुन घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला दिल्या.   
 
नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर, जिल्ह्यातील तपासणी मोहिम, आरोग्यविषयक अत्त्यावश्यक असणाऱ्या सेवा सुविधा याचा आढावा घेऊन शासनस्तरावर लागणारी मदत तत्काळ उपलब्ध करुन देता यावी यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, वैद्यकिय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. कुलदिपराज कोहली यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या सर्व विभागा प्रमुखासमवेत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी नांदेड जिल्ह्यात कुठल्याही वैद्यकिय सेवा-सुविधा कमी पडता काम नयेत याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.  

प्रायोगिक तत्वावर सुविधा द्याव्यात
जिल्ह्यात खासगी रुग्णालयांना ज्या दराने कोविड संदर्भात औषधोपचार व हॉस्पिटलच्या खर्चाची मर्यादा आखून दिली आहे त्या मर्यादेत नांदेडच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा प्रकारची मागणी जिल्ह्यातील अनेक आर्थिक सक्षम असलेल्या वर्गाने केली आहे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या परिसरात यासाठी जागा उपलब्ध आहे. या जागेवर विद्युतीकरण, बेडस् व फर्निचर, इतर अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्यास जे लोक खाजगी दवाखान्यात खर्च देण्यापेक्षा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयासाठी खर्च करु इच्छितात त्यांना प्रायोगिक तत्वावर या सुविधा कशा देता येऊ शकतील याची पडताळणी करुन योग्य प्रस्ताव देण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना दिले.
 
शासकीय रुग्णालयातील स्वच्छतेकडे लक्ष द्या
शासकीय रुग्णालयातील स्वच्छतेबाबत अनेकांच्या तक्रारी आल्या असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे हा प्रश्न अधिक जटिल होण्याचे निदर्शनास आले आहे. स्वच्छतेचा हा प्रश्न सोडविण्यासाठी या बैठकीत खासगीकरणातून हे काम करुन घेण्यास या बैठकित मंजुरी देण्यात आली. याचबरोबर जिल्ह्यात अधिपरिचारिकेची कमरता आहे. यासाठी नांदेड येथील नर्सींग कॉलेज यांच्याशी समन्वय साधून यातील गुणवत्ताधारक इच्छुकांना कोविड-19 च्या निर्देशांतर्गत सेवा घेण्यास वैद्यकिय सचिवांनी अनुमती दिली.      

अधिकाधिक चाचण्यांवर भर द्यावा
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा दर आजच्या घडिला 14 टक्क्यांपर्यंत जरी असला तरी याची काळजी करण्याचे कारण नाही. या तपासण्या जितक्या अधिक प्रमाणात वाढतील त्या प्रमाणात बाधितांचे प्रमाण हे दहा टक्क्यांपर्यंत स्थिरावत कालांतराने कमी होत जाईल. प्राथमिक अवस्थेतच जितक्या लवकर निदान होईल तेवढे बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण सुधारेल, हे लक्षात घेत अधिकाधिक चाचण्यांवर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

SCROLL FOR NEXT