NND26KJP01.jpg 
नांदेड

वेबिनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन....कुठे ते वाचा  

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आणि कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची उगवण कमी झाल्यामुळे पुढील पिकाबाबत काय काळजी घ्यावी, बाबत ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून थेट संवाद साधण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांना मार्गदर्शक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते निर्देश 
जिल्ह्यात पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनीही थेट बांधावर जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपत्तकालीन पीक पेरणीसंदर्भात शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना कृषी विभागाने कृषी शास्त्रज्ज्ञांना सोबत घेवून ऑनलाइन पध्दतीचा अवलंब करत पेरणी संदर्भात माहिती देण्याचे निर्देश दिले होते. 

कृषी विभागाचे कर्मचारी गावा-गावात
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायकांच्या मदतीने प्रत्येक गावात वेबीनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्याचे काम सुरु केले आहे. गावामध्ये क्षेत्रीय अधिकारी जावून शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या जागेत संगणक अथवा लॅपटॉपशी झूम ॲपव्दारे जोडले जात आहे. 

कृषी शास्त्रज्ज्ञ व शेतकऱ्यांत थेट संवाद
कृषी शास्त्रज्ज्ञ व शेतकऱ्यांत थेट संवाद होत असल्याने शेतकऱ्यांचेही समाधान होत आहे. यावेळी प्रत्येक गावातील अनेक शेतकरी सकाळ - संध्याकाळ यात सामील होत आहेत. मागील तीन दिवसात नांदेड उपविभागातील सर्वच गावात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. आगामी काळात जिल्ह्यातील सर्वच गावात हा उपकृम राबविण्यात येणार असल्याची माहिती रविशंकर चलवदे यांनी दिली.

लोकराज्य मासिकाचे मोफत वाटप
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, सामाजिक न्याय दिन व जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहु महाराज पुतळा येथे संस्थेच्या वतीने अभिवादन करून लोकराज्य मासिकाचे दोनशे प्रतीचे मोफत वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढाकार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर, संस्थेचे सचिव माहेश्वरी सोपानराव तादलापूरकर, संस्थेचे अध्यक्ष  कैलास गायकवाड, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, सरचिटणीस अमित कांबळे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष विक्की पाटील कळकेकर सांस्कृतिक कार्य प्रमुख शिवशंकर मुळे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

Latest Marathi News Update: मिसिंग लिंक पुन्हा सुरू; कोसळलेल्या दरडीचा मलबा हटवला

सोलापूर विद्यापीठाची २९ सप्टेंबरपासून परीक्षा! विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अडीच महिने आधी वेळापत्रक जाहीर, वर्गांत सीसीटीव्ही, ७५ टक्के हजेरीचे बंधन, वाचा...

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT