अर्धापूर (जि.नांदेड) : वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापणीस आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तालुक्यातील गणपूर, कामठा, सावरगाव, कोंढा परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटाका बसला आहे. Heavy Rain Damaged Banana Trees In Ardhapur Of Nanded District
नांदेड

अर्धापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळीच्या बागा उद्ध्वस्त

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : तालुक्यात (Ardhapur) गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे खरिपाचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून‌ नेला आहे. या संकटातून सावरत असतानाच पुन्हा सोमवारी (ता.चार) दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain) झाल्याने कापणीस आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तालुक्यातील गणपूर, कामठा, सावरगाव, कोंढा परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटाका बसला आहे.सततच्या निसर्गाच्या संकटात शेतकरी भरडला जात आहे. अर्धापूर तालुक्यातील तिन्ही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने कापणीस आलेले सोयाबीनसह कापूस, हळद आदी पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. या अस्मानी संकटातून शेतकरी (Nanded) सावरत असतानाच पुन्हा सोमवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्याचा काढणीस आलेल्या केळीच्या बागांना फटाका बसला आहे.

उभ्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाले असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटाका बसला आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दिली. त्यांनी तातडीने तालुका प्रशासनास झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे आमच्या खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा केळीच्या बागा बसला असून केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आम्ही जगावे कसे हा प्रश्न आम्हाला पडला आहे? अशी प्रतिक्रिया परमेश्वर बंडाळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

India Next ODI Series: अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला, आता भारताची पुढची वनडे मालिका कधी? पाहा वेळापत्रक

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

SCROLL FOR NEXT