heavy rains Increased Of farmers Debt burden sakal
नांदेड

नांदेड : अतिवृष्टीमुळे वाढला कर्जाचा बोजा

नुकसानभरपाई मिळालीच नाही : पॅकेजची मागणी धूळखात

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाच्या (Corona) कहरामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनाही(farmers) यंदा पावसाने (rain) हैराण केले. गेल्या दीड वर्षापासून संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी सावकार आणि बॅंकांचे कर्ज काढून खरिपाच्या पिकाची पेरणी केली. मात्र, यंदा अवकाळी अतिवृष्टी (heavy rains) व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे(farmers) मोठे नुकसान झाले आहे. पीकच हातून गेल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे.

अतिवृष्टीमुळे खरीपाची पीके हातची गेल्याने बॅंकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने संकटात भर पडते. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने शेतीचा व घरखर्च भागविणे कठीण जात असल्याने जगणे त्या कुटुंबाला असह्य होते. पण शासनाच्या अधिनियमानुसार ज्या शेतकऱ्यांवर कर्ज नाही, त्यांचे प्रस्ताव नामंजूर करून त्यांच्या कुटुंबाला मदत मिळत नाही, हे वास्तव बघायला मिळत आहे.

"शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो. पण निसर्गावर त्याचा ताबा नसल्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. नुकसान झाले तर विरोधक आरडाओरड करतात व सत्ताधारी शासन सर्वेक्षण करून आपली जबाबदारी पूर्ण करते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे यासाटी कोणीच गंभीर नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे."

- रामचंद्र घुसेवाड (शेतकरी)

"पारंपारिक शेतीपासून दूर होऊन वेगळी शेती करण्याचा विचार करून फुलशेतीकडे वळलो. पण दोन वर्ष कोरोनामुळे सर्वच बंद असल्याने फूल शेतातच सडली. लावलेला खर्चही निघाला नाही. पण पुन्हा यावर्षीदेखील फूल शेती केली तर पावसाळ्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सर्व काही नष्ट झाले. याचे सर्वेक्षण देखील करण्यात आले नसल्याने मदत मिळणार तरी कशी.:

- शेख चॉंद शेख पाशा (फुल शेती उत्पादक)

"सतत या ना त्याकारणामुळे शेतातील पिकांचे नुकसान दरवर्षी होत आहे. ओरड झाल्यानंतर सर्वेक्षण देखील केले जाते. मागील वर्षी ही करण्यात आले. पण मदत मात्र मिळाली नाही. यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असतानातरी शासनाने मदत करावी."

- रावसाहेब पाटील घुगे (शेतकरी)

"सर्वच पक्षांना शेतकरी हा निवडणुकीपुरताच महत्त्वाचा वाटत असल्याने एकवेळ सत्ता काबीज केली तर कोणीच त्याला विचारात नाही. जगाचा पोशिंदा जगला पाहिजे असे ना सत्ताधाऱ्यांना ना विरोधकांना वाटते. यामुळेच शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट असताना देखील कोणी त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही."

- सदानंद देशपांडे (शेतकरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : लालबाग राजाची मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवर

Chh. Sambhajinagar: गणेश विसर्जनावेळी जीवघेणा प्रसंग; गणेश भक्ताला जीवनरक्षक दलाने दिले वेळेवर जीवनदान

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

SCROLL FOR NEXT