corona 
नांदेड

हेल्पलाईन प्रसिद्ध झाली अन् गावकऱ्यांची चिंता वाढली... कुठे ते वाचा...

सुनील पौळकर

मुखेड ः दाेन दिवसांपुर्वी शासनस्तरावरून मुंबई-पुण्यात अडकलेल्या व बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केल्यापासून मुंबई-पुण्यावरून आपल्या गावात ‘काेराेना’ येणार या भीतीने गावकऱ्यांची गाळण उडाली आहे. लाॅकडाउनमुळे मुंबई-पुण्यामध्ये अडकलेले गावाकडील विद्यार्थी व मजूर वर्गांना परत पाठविण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू हाेताच आजपर्यंत ‘काेराेना’च्या प्रादूर्भाव नसल्याने निश्चिंत असलेल्या गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात गावा-गावामध्ये स्थापन केलेल्या ॲँटी काेराेना समित्या सजग झाल्या आहेत.

वाढत चाललेल्या लाॅकडाऊनमुळे काही प्रमाणात अडचणी येत असल्या तरी त्यांना सामाेरे जाऊन ग्रामीण जनतेनी स्वतःहून निर्बंध लाऊन घेत गावाच्या सीमा आगंतुकांसाठी बंद करीत गावात गस्ती वाढवल्या आहेत. यामुळे माेठ्या शहरांच्या प्रमाणात गावामध्ये या राेगाचा प्रादूर्भाव राेखण्यात यश
मिळू शकले. 

युवक मंडळींचा समितीवर दबाव
दाेन दिवसांपुर्वी शासनस्तरावरून मुंबई-पुण्यात अडकलेल्या व बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी हेल्प लाईन क्रमांक प्रसिद्ध केल्यापासून मुंबई-पुण्यावरून आपल्या गावात ‘काेराेना’ येणार या भीतीने गावकऱ्यांची गाळण उडाली आहे. दरम्यान स्थानिक पातळीवर गठित केलेल्या समितीने गावात काेणालाही प्रवेश देऊ नये, यासाठी गावातील युवक मंडळी समितीवर दबाव निर्माण करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

आराेग्य तपासणी करूनच प्रवेश
बाहेर राज्यातून किंवा माेठ्या शहरातून तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाची उपजिल्हा रूग्णालयातील काेव्हीड मध्ये आराेग्य तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सांगितले.

उपजिल्हा रूग्णालयातील यंत्रणा सज्ज
तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आराेग्य तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयातील यंत्रणा सज्ज असून इतरांना या विषाणूंचा प्रादूर्भाव हाेणार नाही यासाठी प्रत्येकाने कटाक्षाने आराेग्य तपासणी करणे आवश्यक आहे. 


गावात जाण्याअगाेदर तपासणी करावी 
माेठ्या शहरातून ग्रामीण भागात येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या गावाची व कुटूंबाची काळजी घेण्यासाठी व त्यांना संभाव्य राेगापासून दूर ठेवण्यासाठी गावात जाण्याअगाेदर तपासणी करवून घेऊनच गावात जावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार विलगीकरण कक्षात थांबावे.
लक्ष्मण पाटील खैरकेकर, पंचायत समिती, सभापती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT