Hingoli district MP Hemant Patil was present at the Kojagiri program in Kinwat taluka 
नांदेड

गोकुंद्यातील महिला मंडळाच्या कोजागिरीला आले आनंदाचे उधान

मिलींद सर्पे

किनवट ( नांदेड) : अम्मा ! खासदार हेमंतभाऊ पाटील उन्नडा. राधाबाई रामलू कोत्तुरवार एकदमच उद्गारल्या. सर्व महिला अवाक् झाल्या. गोकुंद्यात राजर्षी शाहू नगरातील महिला कोजागिरी पौर्णिमा साजरी करतांना कोणतीही पूर्वकल्पना नसतांना अचानक खासदार आले. बाजूलाच गुंडाळून ठेवलेली चटई स्वतः अंथरली आणि त्यावर बसले. अन् पात्र समोर घेऊन म्हणाले, काय काय शिजवताय? वाढा आम्हाला. 

दरम्यान हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील अचानक आल्यामुळे सर्व महिला अचंबित झाल्या. खासदार माणूस स्वतः येतात. ना थाट, ना बाट. सर्व सामान्यात मिसळतात. जे असेल ते स्वतः आग्रहानं मागून खातात. सर्वांची ख्याली खुशाली विचारतात. एकोप्यानं उत्सव साजरा करणाऱ्या महिला मंडाळांचं कौतुक करतात. त्यांना शुभेच्छा देतात. हे सगळं पाहून महिला मंडळच नाहीतर गावातील सर्वच ग्रामस्थांना आश्चर्याचाच धक्का बसला. 

कोजागिरीनिमित्त राजर्षीशाहूनगरमधील महिला एकत्र आल्या. एका चुलीवर मोठ्या पातेल्यात दूध तापायला ठेवलं होतं. काही महिलांनी खिचडी तयार करून गप्पा मारत बसल्या होत्या, तर काही महिला भजे तळत होत्या. रात्री ९.२७ ची वेळ असेल, अचानक खासदार हेमंत पाटील यांची गाडी येवून कार्यक्रमस्थळी पोचली. गाडीतून उतरल्यानंतर खासदार थेट महिलांच्या कार्यक्रमस्थळी आले. त्यांनी स्वतः तिथे असलेली छोटी चटई उचलून अंथरली. मग आपसूकच सर्व कार्यकर्ते आजूबाजूला बसले. त्यांनी महिलांना विचारलं, काय बनवत आहात? गरमागरम खिचडी भजे आम्हाला द्या.

महिलांनीही त्यांचा पाहुणचार अगदी आनंदाने केला. खिचडी, भजे व मसाला दुध दिले. या सर्वांवत ताव मारत असतानाच महिलांमध्ये समरस होऊन त्यांनी सुख-दुःखाची विचारपूस केली. हे सगळं पाहून सर्वसामान्य माणसांमध्ये वावरणाऱ्या खासदारांच्या कृतीला सर्व महिलांनी सलाम ठोकला. कारण आजपर्यंत त्यांनी असं कधी अनुभवलं नव्हतं. कोणता आमदार-खासदार अशा पद्धतीने कोणतीही पूर्वकल्पना न देता, कोणतेही निमंत्रण न देता अचानकपणे येतात आणि  महिला घोळका काय करत आहे? त्यांच्याशी संवाद साधतात असे कधीच झाले नाही. 

यंदाच्या कोजागिरीला वेगळाच आनंद मिळाला

राजर्षी शाहू नगरातील राधाबाई रामलु कोत्तरवार, प्रियाताई राजू कुमरे, अंजलीताई कपिल रेड्डी, पद्मीनाताई मुसळे, उज्वला गणपत मडावी, प्रभा सुदर्शन मेश्राम, ललिता मुसने, अनुताई खिसले, मेघा कोत्तुवार, सपना बटूर, रमा परमेश्वर गायकवाड या महिलांनी यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा अचानक आलेल्या खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत साजरी करून एक वेगळा आनंद आम्हा महिला मंडळास मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT