nnd.jpg 
नांदेड

तरुणीच्या धाडसाने वृद्ध दांपत्य बालंबाल बचावले

प्रताप देशमुख


बारड, (ता. मुदखेड) ः बारड (ता. मुदखेड) येथे मुसळधार पावसाने उंच भिंत कोसळून निराधार कुटुंबीयांचे दगड मातीचे घर भुईसपाट झाले असून पंधरा वर्षीय चिमुकलीच्या धाडसाने निराधार कुटुंबाचा जीव वाचला आहे. निराधारांची कोविलवाणी अवस्था पाहून शेजाऱ्यांना मायेचा पाझर सुटला असून या कुटुंबीयांना आधार दिला आहे. 


घराची भिंत खिळखिळ 
मारोतराव जयवंतराव लोमटे हे वृद्ध आपल्या पत्नी सोबत छोट्याशा घरात राहतात. लोमटे यांना अपत्य नसून निराधारांच्या मानधनावर स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. या गावात श्रीमंत लोक राहत असले तरी अठरापगड जमातीच्या गरीब लोकांची संख्याही तेवढीच आहे. पक्की घरे असली तरी कसे घरेही पहावयास मिळतात. निराधार कुटुंबांच्या बाजूला असलेल्या घराची भिंत खिळखिळ झाल्याने अतिवृष्टीच्या पावसात कोसळली असून याचा फटका निराधारांच्या कुटुंबाला बसला आहे. 

हेही वाचा -  दूर्दैवी घटना : बैलगाडीसह सालगडी वाहून गेला, सुदैवाने तो वाचला मात्र...

माणुसकीचे दर्शन घडविले 
निराधार कुटुंबांच्या पत्राच्या घरावर भिंत कोसळल्याने ऐंशी वर्षाचे दाम्पत्य मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. तेवढ्यात शेजारच्या दिव्या बाबुराव लोमटे या पंधरा वर्षीय मुलीने धाडस दाखवत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मूलबाळ नसलेल्या वयोवृद्ध दाम्पत्यांना बाहेर काढून जीव वाचविला आहे. परंतु निराधार बेघर कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी फिरकला नसून साधी माणुसकीही दाखवली नसल्याने प्रसिद्धीच्या झोतात फिरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लाजवेल अशी घटना म्हणावी लागेल. निराधार कुटुंबाला वास्तव्यासाठी कोणताच पर्याय नसल्याने शेजाऱ्याने निराधार कुटुंबाला स्वतःच्या घरात आश्रय देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या निराधार कुटुंबियाच्या मदतीसाठी शासन तसेच सेवभवी संस्था जातीने लक्ष घालून आधार देण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांतून उपस्थित होत आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Road-Indi Railway line : महाराष्ट्र-कर्नाटकसाठी महत्त्वाची बातमी! जत रोड ते इंडी नवीन रेल्वेमार्ग होणार? महाडिकांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र; सर्वेक्षणाची केली मागणी

Marathi News Live Updates : जंरांगेंची प्रकृती खालवली, मंत्री शिष्टमंडळाची पत्रकार परिषद, ओबीसी प्रमाणे मराठा मुलांना संधी

गरोदरपणांनंतर स्त्रीच्या शरीरात काय बदल होतात? मोनिका दबडे अनुभव सांगत म्हणाली, 'सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे...

Solapur IT Park: आयटी पार्कसाठी आठवडाभरात जमीन हस्तांतरण; मोजणी पूर्ण, हद्द निश्चिती अन् सांडव्यासाठी जागेचा निर्णय बाकी

Krishnaraj Mahadik : मनसेच्या चोरांना भाजपच्या पोरांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, भाजप युवा नेते कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग

SCROLL FOR NEXT