download (2).jpg 
नांदेड

धक्कादायक : ‘झिंगाट’ पतीकडून पत्नी व मुलाचा गळा चिरून खून

सुनिल पौळकर


मुखेड, (जि. नांदेड) ः दारू पिऊन झिंगाट झालेल्या एका युवकाने रागाच्या भरात पत्नी व चाैदा महिन्याच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची घटना बुधवारी (ता.२७) सकाळी दहाच्या सुमारास मंडलापुर (ता.मुखेड) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


याबाबत माहिती अशी की, तानाजी भुताळे (वय ३२) हा येडूर (ता. देगलूर) येथील रहिवाशी असून मंडलापुर (ता.मुखेड) ही त्याची सासरवाडी आहे. पत्नी माहेरी असल्याने सासरवाडीला आलेल्या पतीने तिला साेबत येण्याबाबत तगादा लावला हाेता. त्यातच लाॅकडाऊनमुळे आर्थिक अडचण असल्याने दाेघामध्ये वादावादी झाली हाेती. या मुळे पत्नी येडूर येथे जाण्यास नकार देत हाेती. या मुळे तानाजीने दारू पिऊन बुधवारी सकाळी पुन्हा वाद घालण्यास सुरवात केली. 

चिमुकल्याच्या हत्येमुळे सर्वत्र हळहळ
दरम्यान रागाच्या भरात त्याने जवळच असलेल्या तीक्ष्ण हत्याराने पत्नी व चाैदा महिन्याच्या मुलाचा गळा चिरून खून केला. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी ही बाब पाेलिसांना कळविली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पाेलिस निरीक्षक एन.जी.आकुसकर, सहाय्यक पाेलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केला असता सदरील प्रकार उघडकीस आला. चाैकशी करून संबंधित आराेपीस ताब्यात घेतले असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. नक्की काेणत्या कारणासाठी खून करण्यात आला याबाबतची चाैकशी करण्यात येत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. सव्वा वर्षाचा मुलाचा खून झाल्याचे गावकऱ्यांना समजताच गावात एकच खळबळ उडाली हाेती. तर चिमुकल्याच्या हत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात हाेती.  


दुसऱ्या घटनेत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती असी की, आटकळी (ता. बिलोली ) गावालगतच घर बांधून असलेल्या मारुती रघुपती याला दारूचे व्यसन होते. दारुसाठी घरातील सर्व सदस्यांना तो नेहमी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. मंगळवारी (ता. २६) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मारुती रघुपती हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. दारू पिल्यानंतर घरी त्याने मुलाशी व पत्नीशी वाद घातला. यावेळी मारुती रघुपती यांची बहीणही त्या ठिकाणी होती. आत्याच्या देखतच बाप अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याने मारूती रघुपतीचा मुलगा भुजाजी (वय २०) याचा राग अनावर झाला. भुजाजीने धारदार चाकूने मारुतीला भोसकले तसेच गळा चिरून खून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

BAN vs PAK : यांना चौकारही अडवता येत नाही... पाकिस्तानी चेंडूसकट सीमारेषेबाहेर... धाडकन आपटला, हॉस्पिटलमध्ये पोहोचला...

पोलीस आयुक्तांच्या पत्नीच्या पायाला काटा रुतला, डॉक्टर दारू पिऊन उपचारासाठी पोहोचला; नंतर जे घडलं त्यानं...

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचे नाव बदला! माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी

SCROLL FOR NEXT