file photo 
नांदेड

नांदेडकरांनो बाहेर पडताय, तर मग ही घ्या त्रिसूत्री...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहर व जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही १९८ वर पोहचली आहे. त्यातील बरे हेण्याचे प्रमाण जवळपास ६८ टक्के आहे. कोरोनाची बाधा झालेल्या नऊ जणांना आपला प्राण गमवावा लागला. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडताना आता खबरदारी घेणे महत्वाचे आहे. येणाऱ्या काळात मास्क, सॅनिटायझर आणि शारिरीक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागणार आहे. 

कोरोनाचा धोका असतानाही आपण पुन्हा रस्त्यावर उतरणार, आपापल्या कार्यालयात जाणार, खरेदीसाठी बाहेर पडणार, खुल्या झालेल्या उद्यानामध्ये बागडणार, शहर पुन्हा गजबजणार हे सगळ होत असताना कोरोनाविषाणूचा विसर पडून चालणार नाही. गेल्या जवळपास तीन महिन्यापासून लॉकडाउनमध्ये असलेले नांदेड शहर हळूहळू मोकळा श्वास घेत आहे. शहर हळूहळू पूर्वपदावर येण्याची तयारी सुरु झाली. नवीन सुरुवात करताना नागरिकांना पूर्वीसारखे वागून चालणार नाही. कोरोनाने आपल्या जीवनशैलीला बदलून टाकले आहे. हे बदल स्विकारूनच आपल्याला नवी सुरुवात करावी लागणार आहे.

कोरोनाचा धोका अजूनही वाढतो आहे

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण ता. २२ एप्रीलला नांदेड शहराच्या पीरबुऱ्हाननगर भागात आढळला. त्यानंतर शहरात ही संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशाने सलग पाचवे लॉकडाउन लावले आहे. त्यानंतर आता पुन्हा लॉकडाउनमध्ये शिथीलता दिल्याने जनजीवन सुरू होत आहे. मात्र कोरोनाचा धोका असतानाही आपण पुन्हा रस्त्यावर उतरणार. 

त्रिसूत्री आपल्याला भविष्यात पाळावी लागणार आहे. 

आपल्या कार्यालयात जाणार, खरेदीसाठी बाहेर पडणार, खुल्या झालेल्या उद्यानांमध्ये बागडणार, शहर पुन्हा गजबजणार हे सगळ होत असताना कोरोना विषाणूंचा विसर पडून चालणार नाही. कारण तो अद्यापही आपल्या शहरात आहे. त्याचा सर्वत्र ग्रामिण भागापर्यंत फैलाव होत आहे. दररोज नवीन रुग्णांचे निदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वतः ला, आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला आणि आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांना, मित्रांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि शारिरीक अंतर ही त्रिसूत्री आपल्याला भविष्यात पाळावी लागणार आहे. 

वावरताना एक दुसऱ्यापासून सुरक्षित अंतरावर राहणे महत्त्वाचे

घरातून बाहेर पडताना आपण रुमाल, व्हालेट, गाडीची किल्ली, गॉगल्स हे जसे आठवणीने घेतो त्यात आता मास्क आणि हँड सॅनिटायझरची भर पडली आहे. वेळोवेळी सॅनिटायझर वापरणे शक्य नसेल तर साबणाने वारंवार स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे. तसेच बाहेर फिरताना, वावरताना एक दुसऱ्यापासून सुरक्षित अंतरावर राहणे महत्त्वाचे आहे. त्याला आता शारिरीक अंतर म्हटले जात आहे. या तीन गोष्टी आपण नव्या काळात अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT