Illegal sand extraction Officials scam nanded sakal
नांदेड

रक्षकच भक्षक; वाळूच्या गोरखधंद्यात अधिकाऱ्यांचा गोतावळा

अवैध वाळू उपसा व ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर

सुरेश घाळे

धर्माबाद : तालुक्यातील अवैध वाळूच्या धंद्यात अधिकारी व पुढाऱ्यांचा गोतावळा उतरला आहे. प्रशासनात राहून अधिकारी नातेवाईक असलेल्या माफियांना संरक्षण देतात. रक्षकच भक्षक बनले तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची हा प्रश्न आहे. सध्या शहरासह तालुक्यात अवैध वाळू उपसा व ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

बिलोली तालुक्यातील सगरोळी रेतीघाट सुरू झाला आहे. तसेच सदरील वाळू घाटाच्या नावावर तालुक्यातील काही वाळू तस्कर धर्माबाद तालुक्यातील संगम व परीसरातील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणावर चोरी करून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करीत आहेत. सगरोळीच्या एका रॉयल्टीवर संगमची अवैध वाळू वाहतूक दिवस रात्र सुरू आहे. बोगस पावत्यांचाही सर्रास वापर केला जात आहे. पोलिस व महसूल प्रशासनाला माहीत असूनही कार्यवाही केल्या जात नाही. तसेच सदरील प्ररकरणाकडे येथील तहसिलदार व उपविभागीय अधिकारी हे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

वाळू वाहतुकीच्या रग्गड कमाईतून माफिया गब्बर होत असल्याने या धंद्यात आता महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी उडी घेतली आहेत. या धंद्याला ‘बरे’ दिवस असल्याने ‘देर’ कशाला म्हणत काहीजण भाईचाऱ्याचे दर्शन घडवत आहेत. खाकी वर्दीतील रक्षकही यात मागे नाहीत. तसेच माफिया गिरीच्या नावाने गळे काढणाऱ्या पुढाऱ्यांचे नातेवाईक या धंद्यात बिनबोभाटपणे सक्रिय झाले आहेत. महसूल व पोलिस या दोन्ही विभागातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांचा वाळू माफियांना मूक संमती असते. त्या आडून ते रात्रंदिवस अवैध वाळू उपसा व वाहतूक करत आहेत. काही जण राजकीय पक्षाच्या आश्रयाला राहून वाळूचा गोरखधंदा करतात तर काही जण आप्त स्वकीयांच्या नावाने या धंद्याला अप्रत्यक्षपणे पाठीशी घालतात असे दिसते. दरम्यान एवढे सारे गंभीर प्रकार पुढे आल्यानंतर उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके व पोलिस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात दिवसेंदिवस सामान्यांमधून रोष व्यक्त होत आहे.

एक वर्षापूर्वी रेट कार्ड चव्हाट्यावर

दरम्यान वाळूच्या धंद्यातील हप्तेखोरीचे रेट कार्ड एक वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. तसेच महसूल विभागाच्या हप्तेखोरीचा व्हिडीओ पण सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या वेळी वाळूच्या धंद्यातील लोकांनी महसूल व पोलिसांच्या हस्तेखोरीचा पाढा वाचला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. पण कोणावरही कारवाई झाली नाही.

अवैध वाळू उपसा व ओव्हरलोड वाळू वाहतूक धर्माबाद शहरासह तालुक्यात सुरू असल्यास आमच्या विभागातील दोन्ही साईडच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सांगण्यात येईल. तसेच अवैध वाळू माफियांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

- दत्तात्रय शिंदे, तहसीलदार धर्माबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT