suicide  sakal media
नांदेड

नांदेड : वेगवेगळ्या घटनेत दोघींच्या आत्महत्या

एक १९ वर्षीय विवाहिता तर दुसरी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

लोहा : तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनेत मंगळवारी (ता. १४) दोघींनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यामध्ये एक १९ वर्षीय विवाहिता तर दुसरी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.

पिंपळगाव (ढगे) (ता. लोहा) येथील जनार्दन डुबुकवाड यांची मुलगी रुपाली (वय १९) हिचा गेल्या सात महिन्यांपूर्वी दहीकळंबा (ता. कंधार) येथील सोपान पल्लडवाड याच्याशी विवाह झाला होता. सदरील दांपत्य ऊस तोडी कामावरून मागील तीन दिवसापूर्वीच गावी परतले होते. विवाहिता रुपाली ही मंगळवारी (ता. १४) सकाळी अकरा वाजता माहेरी परत आली होती. दुपारी बारा वाजेनंतर रुपाली आईसोबत शेताकडे गेली असता थोड्यावेळाने येते, असे सांगून गेली.

बराच वेळ रुपाली आली नसल्यामुळे तिची शोधाशोध सुरु झाली. दुपारी साडेचार वाजेदरम्यान गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीवर चप्पल असल्याचे निदर्शनास आल्याने विहिरीत गळ टाकून शोधले असता सदरील विवाहितेचा मृतदेह अढळून आला. या प्रकरणी विवाहितेचा माहेरकडील कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून लोहा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील आडगाव तांडा येथील काजल आनंदा पवार (वय १४) ही अल्पवयीन मुलगी मंगळवारी (ता. १४) सकाळी उशीरापर्यंत झोपेतून उठली नाही.

आईने तिला रागविले त्यामुळे त्याचा राग तिच्या मनात होता. दुपारी आई गुरे घेवून शेताकडे गेली तर काजल देखील शेळी घेऊन पेनुर शिवारातील शेतात गेली होती. काही वेळाने दुपारी अडीचच्या सुमारास काजलची आई गुरे चारत असताना काजल ही कपाशीच्या शेतातील चिंचेच्या झाडास दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी रावसाहेब राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून लोहा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT