आॅनलाईन शिक्षणाचे धडे घेताना विद्यार्थी
आॅनलाईन शिक्षणाचे धडे घेताना विद्यार्थी 
नांदेड

संवादातून तंत्रज्ञानाकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा उपक्रम

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : गेल्या दिड वर्षापासून शाळेचे दार विद्यार्थ्यांना बंद असले तरी अद्यावत तंत्रज्ञान, शिक्षकांची धडपड व विद्यार्थ्यांची आवड यातून गेल्या लाॅकडाऊनच्या काळात संवाद साधला जात आहे. विद्यार्थ्यांशी गप्पा या सदरातून मुलांशी गप्पा मारत ज्ञानाचे दार खुले झाले आहेत. या उपकृमात राज्यातील दहा जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी (ता. अर्धापूर ) येथे कार्यरत शिक्षक संतोष मारुती राऊत यांनी कोविडच्या काळात Work from Home च्या माध्यमातून मागील 338 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत. यामध्ये केवळ कारवाडी शाळेतील विद्यार्थी नाहीत तर राज्यभरातील 10 जिल्ह्यातील, अनेक विद्यार्थी जोडले आहेत.

हेही वाचा - या पदार्थांमुळे अशक्तपणा होईल दूर

लॉकडाऊन परिस्थिती, आॅनलाईन शिक्षणाचे आव्हान लक्षात घेऊन जुलौ 2020 पासून दररोज सकाळी झूम मीटिंगच्या मदतीने अर्धा तास योग सराव व आठ ते नऊ या वेळेत शैक्षणिक अभ्यासाच्या तासिका. सायंकाळी एक तास माहिती तंत्रज्ञान तासिका. यामध्ये केवळ शैक्षणिक अभ्यास घेतला जात नसून मागील सात महिन्यापासून या समूहातील विद्यार्थी उत्तम तंत्रस्नेही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आज अनेक विद्यार्थी स्वतः Zoom, Google meetची मीटिंग स्वतःहून घेत आहेत. एवढेच नव्हे तर GMail, PDF, Docs, Google Quiz, Test moz, Puzzle map, Google Earth, Google Map या विविध Appsची माहिती इतरांना मीटिंगमध्ये समजावून सांगत आहेत.

येथे क्लिक करा - नऊ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला विशेष न्यायाधीश एस. एस. खरात यांनी पाठवले दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत

185 Online Test तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या आहेत.

विशेष सांगायचे तर प्रकाश चव्हाण नाशिक यांच्या मार्गदर्शक तासिकेतून दोन विद्यार्थ्यांनी स्वतः चे ॲप्स बनवले आहेत. अशा मुलांशी गप्पा समूह कोरोनाच्या लॉकडाऊन काळातील शिक्षणासाठी पालकांना, मुलांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अभ्यासाबरोबर Apps निर्माते, कवी, लेखक, गायक, सैनिक, वैमानिक, मंत्रालय कक्ष अधिकारी, चित्रपट कलाकार, लघुपट निर्माते, शिल्पकार, चित्रकार, शेतकरी, भजनी, मातीचे किल्ले निर्मिती करणारे अशा अनेक व्यक्तींच्या मुलाखती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करुन पुस्तकाबाहेरचा अभ्यास विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न चालू आहे. राज्यभरात प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना Technosavy बनविण्याचा प्रयोग तोही 100% निशुल्क पद्धतीने आजही चालू आहे. संवादातून तंत्रज्ञानाकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा उपक्रम चांगलाच चर्चील्या जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT