Manali Damodhar sakal
नांदेड

Manali Damodhar : गर्भाशयातील आजाराच्या निदानाची शोधली किट; जागतिक स्तरावर मिळाले सुवर्णपदक

नांदेडची विद्यार्थिनी मनाली गौतम दामोधरने महिलांच्या गर्भाशयाशी संबंधित (पीसीओएस) आजाराचे अगदी सहज सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने किट तयार केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटर येथे विज्ञान शाखेत पदव्युत्तरचे शिक्षण घेत असलेल्या नांदेडची विद्यार्थिनी मनाली गौतम दामोधरने महिलांच्या गर्भाशयाशी संबंधित (पीसीओएस) आजाराचे अगदी सहज सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने किट तयार केली आहे.

जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला असून, त्यांच्या टीमने सुवर्णपदक पटकावले आहे. मनाली ही चिंचगव्हाण (ता. हदगाव) ची मूळ रहिवासी असून, वडिलांच्या नोकरीनिमित्ताने कुटुंब किनवट येथे अनेक वर्षे वास्तव्यास असल्याने मनालीने इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा किनवट येथे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली.

मोठी बहीण डॉ. सांची दामोधर यांच्या मार्गदर्शनाखाली आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटर येथे बॅचलर ऑफ सायन्स, मास्टर ऑफ सायन्स या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला.

पदव्युत्तरची परीक्षा उत्तीर्ण केली. या अभ्यासक्रमाचा एक भाग असलेल्या प्रोजेक्टमध्ये महिलावर्गामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पीसीओएस या स्त्रीरोगावर सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने तिने आपल्या टीमला किटची आयडिया दिली.

गर्भाशयातील पीसीओएस गंभीर आजाराचे निदान आजघडीला सोनोग्राफी आणि काही हार्मोन्स टेस्टिंगच्या मदतीने केले जाते. परंतु, त्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या आजाराचे सहज आणि सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी मनालीने रुग्ण महिलेच्या रक्ताचे सँपल घेऊन त्यावर टेस्टिंग प्रक्रिया करून या स्त्रीरोगाचे निदान करणारी किट संशोधित केली आहे.

विशेष म्हणजे टीममधील सर्वांच्या परिश्रमामुळे हा प्रयोग जागतिक स्तरावरील स्पर्धेत बक्षीसपात्र ठरला आहे. फ्रान्स देशातील पॅरिस या शहरात गतवर्षी घेण्यात आलेल्या नवोदित संशोधकांसाठीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटर (IISER) यांच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याठिकाणी त्यांनी सादर केलेल्या डिटेक्शन किट या संशोधनास सुवर्णपदक मिळाले आहे.

लिव्हर कॅन्सरवरील संशोधनासाठी फ्रान्सकडून निमंत्रण

दरम्यान, फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ बोर्डिअक्स या लॅबने मनालीच्या गर्भाशयावरील निदानाच्या किट संशोधनाची दखल घेऊन लिव्हर कॅन्सरवरील संशोधनासाठी तिला निमंत्रित केले आहे. त्यामुळे तेथील रिसर्च कोर्स करण्यासाठी ४ जून रोजी ती फ्रान्सला जाणार आहे, असेही मनालीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT