बिलोली तालुक्यातील हूनगुंदा वाळू घाट  
नांदेड

नांदेडच्या हूनगुंदा रेती घाटावर जेसीबीने उत्खनन; शासनाच्या नियमांना तिलांजली

बिलोली तालुका हा रेती उत्खननातून मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळून देणारा तालुका म्हणून ओळखला जातो.

अमरनाथ कांबळे

कुंडलवाडी (जिल्हा नांदेड) : येथून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या हूनगुंदा येथील मांजरा नदी पात्रातील खासगी रेती घाटावर रेती ठेकेदारांनी आपला मनमानी कारभार करत खुल्लेआम जेसीबीद्वारे रेती उत्खनन करीत शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे उल्लंघन करीत आहेत. महसूल प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचे पहावयास मिळते.

बिलोली तालुका हा रेती उत्खननातून मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळून देणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यांच अनुषगाने काही दिवसापूर्वी हूनगुंदा येथील मांजरा नदी पात्रातील एक खासगी घाट आनंद पाटील नावाच्या इसमाला चार हजार ब्रास रेती उत्खनन करण्याची परवानगी महसूल प्रशासनाने दिली आहे. पण तो ठेकेदार दुसऱ्या एका शिवाजी पाटील नावाच्या पोटठेकेदाराला संबंधित घाट चालविण्यासाठी दिला आहे. या ठेकेदाराने जेसीबीने नदीपात्रात मोठमोठे खड्डे करुन खुलेआम हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करीत आहे.

हेही वाचा - नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी, समारंभ, सोहळे चालणार नाहीत.

त्या ठेकेदाराला शासनाने चार हजार ब्रासचे उत्खनन करण्याची परवानगी दिली, पण तो महसूल प्रशासनाची दिशाभूल करत आजतागायत हजारो ब्रासच्या आसपास उत्खनन केल्याची बाब समोर येत आहे. या घाटावरुन दररोज जेसीबीद्वारे चौदा, सोळा, दहा, टायरी ट्रक हायवा अशी दोनशेच्या वर वाहने क्षमतेपेक्षा जास्त ओहरलोड भरून जात आहेत. तसेच या ठेकेदाराने शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे उल्लंघन करीत आपला मनमानी कारभार चालू ठेवला आहे.

शासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही कडक निर्बंध घातले असले तरी रेती घाटावर मात्र या उलट फार विदारक चित्र पहावयास मिळत आहे.या ठिकाणी कोरोनाच्या कुठल्याही निर्बंधांचे पालन केले जात नसून जणू नागरिकांची जत्राच भरली असल्याचे दिसून येते. यातून मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो हे नाकारता येणार नाही. असे असले तरी सर्व सामान्य नागरिकांना वेगळे नियम व रेती ठेकेदाराला वेगळे नियम असल्यामुळे नागरिकांतून प्रशासना विषयी संताप व्यक्त होत आहे. अशा गंभीर बाबीकडे संबंधित उपविभागीय अधिकारी, महसूल प्रशासन, आरटीओ व पोलिस प्रशासन आदींनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी झोपेचे सोंग घेत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT