file photo 
नांदेड

खाकीला डाग, सोनखेडचा ठाणेदार कंट्रोलला

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सोनखेड (ता. लोहा) पोलिस ठाण्यातील अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांना मोठ्या विश्‍वासाने पोलिस ठाणे बहाल करण्यात आले होते. परंतु त्यांनी आपल्या कर्तव्यात कसुर करुन खाकीला डाग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी तातडीने त्यांच्यासह अन्य चार जणांना नियंत्रण कक्ष व पोलिस मुख्यालयात बोलावून घेतले. यामुळे कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.  

नांदेड- लातूर महामार्गावर सोनखेड (ता. लोहा) येथे पोलिस ठाणे आहे. या ठाण्याच्या हद्दीला लोहा, कंधार, नांदेड ग्रामिण, उस्माननगर पोलिस ठाण्याच्या सिमा लागून आहेत. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी मोठ्या विश्‍वासाने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या खांद्यावर सोनखेड पोलिस ठाण्याची जबाबदारी टाकली. ही जबाबदारी त्यांनी काही महिणे पेलली. मात्र नंतरच्या काळात त्यांचा अवैध धंदेवाल्यांशी संबंध आला.

गुटखा व आदी अवैध धंदे आले अंगलट

विनापरवानगी बंदी असलेल्या गुटखा घेऊन जाणारे वाहन सोडून दिले. ही बाब पोलिस अधीक्षक यांच्या लक्षात आली. त्यांनी हे प्रकरण गंभीर असून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. आडे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक आत्माराम मुधोळकर यांना नियंत्रण कक्ष तर सहाय्यक फौजदार आनंद नरवाडे व चालक अतुल नागरगोजे यांना पोलिस मुख्यालयात बोलावून घेण्यात आले आहे.  

येथील डीबी शाखाही वादात

या पोलिस ठाण्याच्या डीबीमधील कर्मचारी सर्रास वाळू ठेक्यावर जावून वसुली करत असल्याचे वृत्त यापूर्वी दैनिक सकाळने प्रकाशीत केले होते. यासह आदी तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. अवैध धंद्याना स्थानिक पोलिस नियंत्रणात आणु शकत नव्हते. उलट त्या धंद्याना ते प्रोत्साहान देत असल्याचे समोर आले. त्यामुळे ठाणेदार व त्यांच्या सहकार्याना तडकाफडकी नियंत्रण कक्षात बोलावून घेण्यात आले आहे. एवढेच नाही तर याच प्रकरणात अन्य दोन पोलिसांकडून खूलासा मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिस खात्यातील कामचुकार व वर्दीला कंलकीत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे मत पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी बोलुन दाखविले. या निर्णयामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. 
  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Outsourced Hiring: आउटसोर्स भरती म्हणजे युवकांचे शोषण; हायकोर्टाचा मोठा निर्णय, सरकारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

T20I Record: क्रोएशियाच्या २३ वर्षीय फलंदाजाचा अविश्वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड; IPL सोडा पठ्ठ्याने ३ सामन्यांत जगाचे लक्ष वेधले

‘बाप्या’मधील राजश्री देशपांडेच्या लूकची चर्चा शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास ठरतोय खास!

Mumbai: महागाई वाढता वाढे! दरवाढीच्या तव्यावर भाजी-पोळी केंद्रे होरपळली, ग्राहकसंख्येत घट; व्यावसायिक चिंतेत

मुंबईत कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम लागू! आता ४ प्रकारांत करावे लागणार कचऱ्याचे वर्गीकरण, नियम तोडल्यास कारवाई होणार

SCROLL FOR NEXT