file photo 
नांदेड

किनवट : गांधीनगर येथील घरे वाचविण्यासाठी लाल आणि निळा झेंडा एकत्रितपणे लढा देणार - माकप

प्रल्हाद कांबळे

किनवट - येथील गांधीनगरमध्ये मागील 35 वर्षापूर्वी पासून मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कामगारांची घरे आहेत. परंतु डीपीडीसीचा रस्ता मंजूर करून तेथील घरे ऊठवून स्थानिक नागरिकांना बेघर करण्याचा घाट किनवट येथील काही सत्ताधारी करीत असल्याची बाब आज तेथील नागरिकांनी निदर्शनास आणून दिली आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दोन दिवशीय जिल्हास्तरीय पक्ष कार्यकर्त्यांचे शिबीर किनवट येथे होत असल्यामुळे पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच नेतृत्व किनवट मध्ये आहे.गांधी नगर येथील रहिवास्यांकडे घर टॕक्स पावती, लाईट बील, पक्के घरे, रस्ता ह्या सर्वच नागरी सुविधा शासनाने पुरविल्या आहेत. परंतु काही बिल्डर लॉबीला मदत करण्याच्या उद्देशाने स्थानिक राजकीय मंडळी या गोरगरीब रहिवास्यांना हुसकावण्यासाठी प्रयत्नशील आहे असे समजते.

तेथील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी माकप जिल्हा समितीचे शिष्ठमंडळ प्रत्यक्षात जायमोक्यावर जाऊन तेथील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्या शिष्ठमंडळात राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. विजय गाभणे, कॉ. अर्जून आडे, कॉ. शंकर सिडाम, कॉ. विनोद गोविंदवार, कॉ. किशोर पवार, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. प्रल्हाद चव्हाण, कॉ. मंजूश्री कबाडे, कॉ. अरूण दगडू, कॉ.स्टॕलिन आडे, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. अंकुश अंबुलगेकर, कॉ. अंकुश माचेवाड आदींचा समावेश होता.

अनेक वर्षापूर्वीपासून असलेली घरे वाचविण्यासाठी लाल व निळा झेंडा एकत्रितपणे येऊन लढण्याचा निर्णय झाला असून कॉ.अर्जून आडे पुढील आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. कॉ. विजय गाभणे म्हणाले की,गरज पडल्यास हे प्रकरण जिल्हा तसेच राज्य शासनाच्या निदर्शनास आणून जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे योग्य पाठपुरावा करून किनवट येथील गांधीनगरच्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी कसोशीने प्रयत्न करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Alert India : पुढील तीन दिवस देशभरात मुसळधार पावसाची शक्यता; 'या' राज्यांत चक्रीवादळ तांडव माजवणार, IMD कडून सतर्कतेचा इशारा

Shevgaon politics: 'शेवगावातील मातब्बरांचा भाजपत प्रवेश'; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडी, राजळेंसोबत जाण्याचा निर्णय

Devgad Hapus Mango : फळांचा राजा आला बाजारात; दिवाळीत 'देवगड' हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल

Husband Poisoned By Wife : धक्कादायक! विषारी द्रव पाजून पतीचा खून; आजाराने गेल्याचा बनाव, पत्नीसह तिघांवर गुन्हा

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत थंडी गायब, 'ऑक्टोबर हिट' चा चटका वाढला, आज राज्यातील 'या' भागांत पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT