

Despite BJP Star Campaign, Satej Patil’s Micro Planning Wins
esakal
Congress Leader Satej Patil News : केंद्रात आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार आणि डझनभर आमदारांची फौज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेसाठी काँग्रेसविरोधात रिंगणात उतरली. मात्र, कोणी, कितीही करू दे विरोध, ‘त्याला एकटा बास’ म्हणत कोल्हापूर महानगरपालिकेत एकहाती तब्बल ३५ उमेदवार जिंकत आमदार सतेज पाटील यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे.