sand mafia  sakal
नांदेड

नांदेड : वाळू उत्खनन, वाहतुकीवर निर्बंध नसल्याने अपघातात वाढ

किनवट तालुक्यात अवैध उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

किनवट : वाळूचा काळा बाजार करणाऱ्या वाळूमाफियांना आवरणे कठीण दिसत आहे. पथकावर हल्ला करुन दहशत माजवण्याचा घटनांमुळे यंत्रणांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होऊ शकते. सद्या अधिवेशन चालू असून वाळूविषयक कठोर कायदा करणे काळाची गरज आहे. माहूर तालुक्यातील पैनगंगा पात्रातील रेती घाटाचा लिलाव केल्याचा आधार घेत वाळूमाफियांनी लांब पल्याच्या एकाच पावतीवर किनवट व गोकुंदा येथे रोज चार चार ट्रीप करुन शेकडो बंगल्यांच्या बारमाही बांधकामांना रात्रंदिवस वाळू ट्रॅक्टरने नव्हे तर मोठ्या टिप्परने पुरवठा करतात, याचे सर्वच साक्षीदार आहेत.

जिल्हाधिकारी ‍यांनी काही दिवसापुर्वी वाळू तस्कराला पावती आधारे चंद्रपूरची हवा दाखवली. तद्वतच किनवट प्रशासनाने त्याच्याच पुनरावृतीचा बडगा उगारल्यास वाळू तस्करीला किमान किनवट तालुक्यात तरी शिरकाव करायला वाव मिळणार नाही आणि प्रशासनाची डोकेदुखी पण कमी होईल. पांढरपेशांनी वाळूचा उच्छाद मांडला आहे. माहूर तालुक्यातील काही ठिकाणच्या पैनगंगा वाळू घाटाचा लिलाव झाला पण किनवट तालुक्यातील वाळूघाटाचे लिलाव झालेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

किनवट तालुक्यात लिलाव झाला नसला तरी रॉयल्टीच्या वाळू धंद्याला लाजवेल असा बारमाही वाळूचा पुरवठा चालू आहे. हे शेकडो बंगले व घरांच्या बांधकामावरुन सिद्ध होते. शासकीय सुट्यांच्या दिवशी तर रात्रंदिवस मोठमोठे टिप्पर वाळू आणताना दिसतात. लिलावाच्या वाळूला सुर्योदय ते सुर्यास्ताच्या अटी शर्थी असतील मात्र चोरट्या वाळूला मात्र सर्व कांही खुल्लमखुल्ला असते. वाळू घाटापासून दीडशे किलोमीटरपेक्षा जास्त लांब पल्यावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या नावाने एकच वाहतूक पावती घेऊन त्याच पावतीवर किनवटमध्ये चार चार ट्रीप वाळू पुरवठा करीत असल्याची चर्चा आहे. प्रमुख ठिकाणी बैठे पथक ठेऊन पावती गुगल सर्च केल्यास वाळूतस्करांचे पित्तळ उघडे पडणार. यात शंकाच नसल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT