नांदेड

कृष्णुर एमआयडीसी शिवारात जुगार अड्ड्यावर कुंटुर पोलिसांची धाड

चंद्रकांत सुर्यतळ

कुंटुर पोलिस स्टेशन अंतर्गत सर्वात मोठा जुगारावर छापा टाकला असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

बरबडा (नांदेड) : कुंटुर पोलिस स्टेशन (Kuntur Police Station) अंतर्गत मौजे कुष्णुर एम आय डी सी  शिवारात यांच्या टिनशेडमध्ये चालत आलेली जुगारची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कुंटुर येथील पोलिस निरीक्षक करिम खान पठाण व उपनिरीक्षक दिनेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलिस टिम ला घेऊन जुगार अड्ड्यावर छापा टाकला. (kultur police raided a gambling den in krushnur MIDC shivar)

सदर छापामध्ये 25 व्यक्तीसह, 3 कार (फोरविलर), 8 मोटारसायकलीसह, अंदाजे 15 लाख रुपयांच्यावर मुद्दे मालकासह अटक करण्यात आले. कुंटुर पोलिस स्टेशन अंतर्गत सोमठाणा शिवारात चार जुगार खेळणाऱ्या चार दिवसाखाली नांदेड एल सी बी पथकाने पकडले होते. कुष्णुर एम आय डी सी परिसरात अनेक ठिकाणी जुगार अड्डे चालले जातात. मात्र बिट प्रमुख यांच्या आशीर्वादाने सदर प्रकरण उघडकीस आले नव्हते. मात्र नांदेड एल सी बी पथकाने कुंटुर पोलिस ठाणे हद्दीतील जुगारावर धाडी टाकल्या आहेत. कुष्णुर बिट प्रमुख यांचे त्या बिटवर लक्षच नसल्यामुळे सदर अवैध धंदे सुरू असल्याचे नागरीकातून चर्चा आहे.

कुंटुर पोलिस स्टेशन अंतर्गत सर्वात मोठा जुगारावर छापा टाकला असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. कुंटुर पोलिस यांच्या बेधडक कारवाईमुळे, अनेक लोकांचे संसार उद्धवस्त होण्यापासून वाचवले असल्याचे महिला वर्गातून ऐकावयास मिळत आहे. जुगार खेळणाऱ्यात काही प्रतीशती नागरिक व कर्मचारी वर्ग, उच्च प्रभु लोकांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. कुष्णुर बिट अंतर्गत नांदेड ते हैदराबाद हायवे रस्त्यावर धाबे, हॉटेलमध्ये, पानटपरी, अवैध देशी, विदेशी दारू, गुठखा, जुगार, अवैध वाळू वाहतूक, लाकूड तस्करी आहे. तसेच अवैध धंदे सुरू असल्याचे नागरिकांतुन सांगितले जात आहे. (kultur police raided a gambling den in krushnur MIDC shivar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT