file photo
file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ आणि २९ जानेवारीला होणार

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यातील नांदेड, भोकर, हदगाव, किनवट, धर्माबाद, बिलोली, देगलूर व कंधार या तालुक्याचे सरपंचपदाचे आरक्षण कार्यक्रम गुरुवारी (ता. २८ जानेवारी) सकाळी अकरा वाजता तसेच अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, उमरी, नायगाव, मुखेड व लोहा या तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण कार्यक्रम शुक्रवारी (ता. २९ जानेवारी) सकाळी अकरा वाजता सर्व संबंधित तालुका मुख्यालयी होणार असल्याची माहिती सामान्य विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद मंडलीक यांनी दिली. 

नांदेड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या एक हजार १५ ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायतीची निवडणुक रद्द झाली होती.  तसेच १०६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ९०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. आता आगामी पाच वर्षासाठीचे सदस्य मतदारांनी निवडून दिले आहेत. आता सदस्यांसह सर्वांचेच ता. २८ आणि ता. २९ जानेवारी रोजी होणाऱ्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. 

पूर्वीचे आरक्षण झाले होते रद्द
ग्रामपंचायत निवडणुक होण्याआधी प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी सरपंच पदासाठी लिलाव झाल्याच्या घटना समोर आल्या तसेच काही ठिकाणी तक्रारीही झाल्या त्यामुळे राज्य सरकारने सरपंचपदाचे आरक्षण रद्द करून निवडणुका पार पडल्यानंतर नव्याने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम ग्रामपंचायत निवडणुकांवर झाला. काही ठिकाणचे किरकोळ अपवाद वगळता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडल्या. गावागावात पॅनेलप्रमुखांनी आपआपले पॅनल तयार करून चांगली लढत दिली. 

आरक्षण सोडतीकडे लक्ष
सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आणि विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी दावे - प्रतिदावे करत आमच्याच पॅनेलचे वर्चस्व मिळवल्याचा दावा करण्यास सुरूवात केली. काही ठिकाणी काट्याची लढत झाली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षविरहित असल्यामुळे कोण कोणाच्या बाजूने आणि कोण कोणत्या पक्षात हा विषय गौण असतो. मात्र, आता सरपंचपदाची निवडणुक होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच येत्या ता. २८ आणि ता. २९ जानेवारी रोजी होणाऱ्या सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले आहे.  

आरक्षणानंतर होणार चित्र स्पष्ट
दरम्यान, त्या त्या गावातील पॅनलप्रमुखांचा आणि सदस्यांचा गावकऱ्यांसह विविध पक्षातील नेतेमंडळी आणि पदाधिकारी यांनी सत्कार केला.  मात्र, असे असले तरी सरपंचपद मिळेपर्यंत पॅनलप्रमुख देखील सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. आपला समर्थक सदस्य दुसऱ्या गटात किंवा पॅनलमध्ये जाणार नाही, याची खबरदारी पॅनलप्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सरपंचपदाचे आरक्षण कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा पॅनलप्रमुख आणि त्यांचे सदस्य सतर्क झाले असून आरक्षणानंतर त्या त्या गावात सरपंच कोण होऊ शकतो, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT