Nanded News 
नांदेड

Video : विचारांपेक्षा भावनेनेच जीवन होते प्रभावित, कसे? ते वाचाच  

प्रमोद चौधरी

नांदेड : वास्तविक पाहता सकारात्मक मानसिकता ठेवून वाटचाल करता येते अन् नकारात्मक मानसिकता बाळगूनही वाटचाल करता येते. विचारांपेक्षा माणसाचं जीवन भावनेनं अधिक प्रभावित होते. सकारात्मक भावनेत जगता येणं ही फार मोठी उपलब्धी ठरते. सकारात्मक भावना आनंदित, उत्साहित करते तर नकारात्मक भावना दुःखी, निरूत्साही करते.  

आपल्या कुटुंबातील एक लाख रुपये चोरांनी चोरून नेले. सकाळी उठल्यावर आपल्या लक्षात आले. तेव्हा आपण सगळे जण रडत बसणे, एकमेकांना दोष देणे, शिवीगाळ करणे, एकमेकांना तुझ्या करकरीमुळे ही शनि, पिडा आली असा आरोप करणे, एकमेकांच्या अंगावर जाणे, मारामारी करणे, उदास, निराश होऊन जेवण न करता, कोणतंच काम न करता दोन्ही पायात मुंडी घालून बसणे.

सकारात्मक कसं बघायचं? 
बरं झालं, लाख रुपयेच गेले, आपल्या कुणाला काहीच झालं नाही. एखाद्याचा जीव गेला असता तर कसं झालं असतं, आपण सगळे सुखरूप आहोत, बाजूच्या गावात चोरांनी मारून टाकून सगळंच नेले नव्हते का? तशी वेळ आली नाही, छान झाले. आता आपण एक जण जाऊन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करून घराला गेट बसवून घेऊ. म्हणजे पुढे असे होणार नाही म्हणून अजून काय काय उपाय करता येतील ते पाहू असा सकारात्मक विचार करून उपाययोजनावर भर देता येईल.

संकटातही संधी शोधता येते
सकारात्मक जगणारा माणूस संकटात संधी पाहतो तर नकारात्मक जगणारा माणूस संधीतही संकट शोधून दुःखी होतो. सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक भावना  कल्पना आणि विचार जीवन समृद्ध करणारी आयुधं आहेत. आपण कोणत्या भावनेत जगायचं हे आपली निवड आहे. प्रेम, मानसिक समाधान, प्रसन्नता, शांतता, सुख शांती, आनंद, आशा, क्षमा, उत्साह, समाधान, तृप्ती या सकारात्मक संवेदना आहेत. सकारात्मक भावना मानसिक समाधान आणि नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. उपाय सुचवतात आणि त्या उपाययोजना अंमलात आणण्यासाठीच आत्मबळ देतात.

चांगुलपणावर लक्ष केंद्रित करावे
मन, बुद्धी भावना विचार आणि कल्पना तर करतात, आपण त्या नकारात्मक करायच्या का सकारात्मक करायचं आपण ठरवायचे. जशी सवय लावू तशी लागते. यासाठी भानावर राहणंही गरजेचे आहे. भय, चिंता, घृणा, ईर्ष्या, क्रोध, सुडभावना, तिरस्कार आदी नकारात्मक भावना अनेक आजारांना आमंत्रण देतात. मानवी संबंध नीट ठेवत नाहीत. नीट झोप लागत नाही आणि विकासाच्या दिशेने झेपावणही शक्य होत नाही. या दुष्परिणामांपासून सुटका करून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक विचार, भावना, कल्पना निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक चांगुलपणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरते. 

ठाम विश्‍वास बाळगा
नकारात्मकच मन:स्थिती  जगायची सवय लागली,तर सकारात्मक भावना निर्माण करू शकत नाही.त्यामुळे सकारात्मक ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक आणि उपकारक आहे असा ठाम विश्वास बाळगून तसं जगण्याचा निर्णय घेऊन वाटचाल केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.
- डॉ. हनुमंत भोपाळे, समुपदेशक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT