file photo 
नांदेड

लॉकडाउन: तब्बल 80 दिवसांनी हैद्राबाद- नांदेड- मुंबई विमानसेवा सुरु

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये संबंध देशभर विमानसेवा बंद करण्यात आली होती. अजूनही पूर्णवेळ विमानसेवा सुरू करण्यात आली नाही. देशांतर्गत काही शहरांसाठी सेवा करण्यात आली असून गुरुवारी (ता. ११) तब्बल ८० दिवसांनी हैद्राबाद- नांदेड- मुंबई ही ट्रुजेटची विमानसेवा सुरू झाली. मात्र ही सेवा सध्या तरी आठवड्यातून एकच दिवस म्हणजे गुरूवारी सुरू राहणार आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन लावण्यात आले आहे. त्यात भारतातही पाचवे लॉकडाउन सुरू आहे. या काळात कोरोनाची बाधा होउ नये म्हणून शासन व प्रशासन खबरदारी घेत आहे. या आजारामुळे जगातील महासत्ता असलेल्या देशआंनी गुडघे टेकविले आहेत. अजुनही या आजारावर लस किंवा कुठलेच औषध मिलाले नाही. या आजाराला हरविण्यासाठी एकमेव इलाज म्हणजे शारिरीक अंतरव तोंडाला मास्क वापरणे होय. विमानाद्वारे फार दुरदुरचे प्रवाशी प्रवास करतात. त्यांच्या माध्यमातून कोरोनाची लागन होउ नये म्हणून नांदेड विमानतलावरील सेवा ता. २४ मार्च पासून बंद करण्यात आली होती. 

श्री गुरु गोविंदसिंग विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे
 
नांदेड शहर हे देशातील काही महत्वाच्या शहराशी विमानसेवेने जोडले गेले आहे. येथील गुरु गोविंदसिंग विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून येथून दिल्ली, चंदीगड, अमृतसर, मुंबई आणि हैद्राबाद अशी विमानसेवा चालत होती. या ठिकाणी सचखंड गुरुद्वारा असल्याने जगातील शिख भाविक दर्शनासाठी विमानाने येत असतात. परंतु लॉकडाउनमुळे सर्वच देवस्थान बंद असून विमानसेवाही ठप्प करण्यात आली होती. पाचव्या लॉकडाउनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आली. काही रेल्वे तर काही बससेवा सुरु करण्यात आल्या आहेत. 

आरोग्य तपासणी करूनच प्रवाशांना सोडले

गुरूवारी (ता. ११) तब्बल ८० दिवसांनी ट्रुजेट कंपनीचे हैद्राबाद- नांदेड- मुंबई हे नियमीत चालणारे विमान सुरू झाले. गुरूवारी आलेल्या विमानात हैद्राबाद येथून २६ प्रवाशी आले. तर नांदेडहून मुंबईला ६० प्रवाशी रवाना झाले. आलेल्या व गेलेल्या सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी कसुन करण्यात आली. सॅनिटायझर, मास्क, थर्मल मशिनद्वारे तपासणी करूनच प्रवाशांना सोडण्यात आले. यावेळी विमानतळ पोलिसांनी व विमानतळ अड्डा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुरक्षा अधिकारी शिवप्रसाद कत्ते, श्री. खंदारे, फौजदार चित्तरंजन ढेमकेवाड, गजानन कागणे, श्री. लाखोळे व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT