फोटो 
नांदेड

लाॅकडाउन : न्यायालयात आता वन स्टाॅप सेंटर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याद्वारे वन स्टाॅप सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. 

लाॅकडाऊनच्या काळामध्ये कुठल्याही महिला अथवा बालकावर कौटूंबिक हिंसाचार होत असल्यास त्यांना त्यापासून संरक्षण मिळावे व त्यांना मदत मिळावी या हेतूने या सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. या सेंटरचे काम २४ तास चालू राहिल. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे अॅड. पी. एच. रतन व अॅड. कुमू वाघमारे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. जर कौटूंबिक हिंसाचार होत असल्यास आपण अॅड. पी. एच. रतन यांना 9923040996 व अॅड. कुमू वाघमारे यांना 9689881195 या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करावे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ई- मेल आयडीवरसुध्दा आपण आपली तक्रार नांदवू शकता. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचीव तथा न्यायाधीश राजेंद्र रोटे यांनी केले आहे.

लोहामध्ये २५ हजाराची गावठी दारु जप्त 

नांदेड : लोहा तालुक्यात विनापरवाना दारुचा पूर वाहत असतानाच पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये २५ हजाराची गावठी दारु जप्त करण्यात आली. ही कारवाई पारडी तांडा (ता. लोहा) येथे शनिवारी (ता. दोन) केली. 

लोहा तालुक्यातील पारडी तांडा येथे गावठी दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती लोहा पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक श्री. मोहिते यांनी हवालदार अशोक केंद्रे यांना त्यांच्या मदतनिसांसह पाठविले. श्री. केंद्रे हे पारडी तांडा येथे शनिवारी (ता. दोन) दुपारी कारवाई केली. यावेळी एकाच्या घरातून तब्बल २५ हजाराची गावठी दारु जप्त केली. पोलिसांनी यावेळी एकाला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हवालदार अशोक माधव केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. भुत्ते करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT