फोटो 
नांदेड

लॉकडाउन : ‘या’ विभागाची शंभर कोटींची उलाढाल- लिंगायत

प्रल्हाद कांबळे

नांदेड :  कोरोनाच्या महामारीत डाक विभागाने गोरगरीब जनतेच्या दारात जाऊन जिल्ह्यात जवळपास शंभर कोटी रुपायांची उलाढाल केल्याची माहिती डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी बुधवारी (ता. २०) ‘सकाळ’शी बोलतांना दिली.

डाक अधिक्षक श्री. लिंगायत म्हणाले की, जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४१८ ब्रँच पोस्ट ऑफिस व ५१ सब पोस्ट ऑफिस आणि एक मुख्य पोस्ट ऑफिस आहे. जवळपास दीड हजार खेडे, वाड्या- तांड्या आहेत. या भागातील नागरिकांना कोरोनाच्या महामारीत आर्थिक त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाच्या दारात पोस्ट बँकेच्या Aeps प्रणालीद्वारे दोन कोटी रुपयांचे कोणत्याही बँक खात्यातील पैसे पोस्टमनमार्फत वाटप केले. तर निराधार, दिव्यांग, अंध, जेष्ठ नागरिक, किसान सन्मान योजना, गरीब कल्याण योजना, जनधन, गरोदर माता आहार भता, गॅस सबसिडी असे पाच कोटी रुपयांचे आपल्या बँकेच्या मायक्रो ATM द्वारे वाटप करण्यात आले आहे. 

लॉकडाउन व शासकीय नियमाचे पालन 

नांदेड मुख्य पोस्ट ऑफिस व सब पोस्ट ऑफिस मधून जमा व वाटप सर्व पोस्ट व्यवहाराचे ९० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याचे श्री. लिंगायत यांनी सांगितले. विशेष करून हे सर्व व्यवहार डिजीटल व्यवहार करण्यात आले. सर्व शासकीय नियमाचे तंतोतंत पालन करण्यात आले असल्याचेही सांगितले.

एईपीएस प्रणाली वरदान

तसेच नांदेडचे मुख्य पोस्ट मास्तर डी. एम. जाधव यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांना पैशाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून दररोज मुख्य पोस्ट ऑफिसमधील दहा पोस्टमन व एक स्पेशल काउंटरद्वारे पैशाची देवाण- घेवाण सुरू आहे. इतवारा, सिडको, शिवाजीनगर, मिल गेट, अशोक नगर, तरोडा नाका, नांदेड टाऊन, सचखड, चैतन्य नगर, विद्यापीठ या पोस्ट ऑफिसमधून दररोज विविध प्रकारच्या योजनांचे पैसे वाटप व Aeps प्रणाली द्वारे दररोज ५०० ते ६०० नागरिकांना पैसे वाटप या कोरोनाच्या संकटकाळी करण्यात येत आहे.

विविध योजनांचे पैसे वाटप

सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी व नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क, हॅन्ड ग्लोज, हँड वॉश देण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंग अंतर ठेऊन ही सेवा सुरू असल्याचे सांगितले. नांदेडचे डाक विकास अधिकारी सुरेश वाघमारे यांनीही लॉकडाउनमध्ये डाक जीवन विमाचे काम आम्ही उत्कृष्टपणे पार पाडत आहोत. नागरिकांना त्यांच्या वेळेवर आम्ही या दोन महिन्यांत ४१ डाक जीवन विमा ग्राहकांना मुदत संपल्याने ५३ लाख ७० हजार ४१६ रुपयांचे धनादेश मुदत संपलेल्या ग्रहाकांच्या बचत खात्यात जमा केले आहे. तर १३ लाख ३२ हजार डाक जीवन विमा धारकाला लोण मंजूर करून दिल्याचे सांगितले. हे सर्व व्यवहार डिजीटल डाक प्रणाली द्वारे करण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

SCROLL FOR NEXT