नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामूळे लॉकडाऊनच्या कालावधीत संपुष्टात आलेल्या परवान्यांचे नुतनीकरण, मंजूरपत्र, बदली वाहन, इरादापत्राची वैधता वाढवून देण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदवाढ दिली आहे. त्यानुसार राज्य परिवहन प्राधिकरणाने मुद्याची नोंद घेऊन कोरोना विष्णूचा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत संपुष्टात आलेल्या मोटार वाहन विषयक दस्तऐवजांची वैधता केंद्र शासनाने 1 फेब्रुवारी 2020 पासून 31 डिसेंबर 20220 पर्यंतच्या कालावधीसाठी वाढविला आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलजावणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
ऑटोरिक्षा यांची वयोमर्यादा निश्चीत करणे
ऑटोरिक्षाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून गणनेचा दिनांक व मुंबई व्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये ऑटोरिक्षांकरिता सुधारित वयोमर्यादा वर्षं पुढीलप्रमाणे राहील. गणनेचा ता. एक ऑगस्ट 2021 पर्यंत 20 वर्षे. ता.एक ऑगस्ट 2022 पर्यंत 18 वर्षे. ता. एक ऑगस्ट 2023 पर्यंत 16 वर्षे. ता. एक ऑगस्ट 2024 पर्यंत 15 वर्षे ही सुधारित वयोमर्यादा राहिल.
मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 113 चा भंग करून सकल भार क्षमतेपेक्षा (जी. व्ही. डब्ल्यू.) अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांना परवानाधारकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 अंतर्गत विभागीय कार्यवाही करण्यात येईल.
परवाना निलंबनाची कारवाई होणार
यात गुन्ह्यांचे स्वरूप- सकल भार क्षमतेपेक्षा (जी.व्ही. डब्ल्यू.) अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतूक करणे, मोटार वाहन प्रकार-हलकी मालवाहू वाहनासाठी अतिरिक्त भार 5000 कि.ग्रा. पर्यंत पहिल्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 10 दिवसासाठी परवाना निलंबन, निलंबनाऐवजी सहमत शुल्क पाच हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाईत 20 दिवसासाठी निलंबन, निलंबनाऐवजी ऐवजी सहमत शुल्क 10 हजार रुपये राहील. तिसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 30 दिवसासाठी परवाना निलंबन, निलंबनाऐवजी सहमत शुल्क 15 हजार रुपये राहील. 5001 कि. ग्रा. पेक्षा जास्त अतिरिक्त भारसाठी 10 दिवसासाठी परवाना निलंबन व निलंबनाऐवजी सहमत शुल्क रु. सात हजार व 20 दिवसासाठी 14 हजार रुपये तर 30 दिवसासाठी 21 हजार रुपये राहील.
मध्यम मालवाहू वाहनासाठी
मध्यम मालवाहू वाहनासाठी 5000 कि.ग्रा. पर्यंत 10 दिवसासाठी निलंबनाऐवजी सहमत शुल्क 10 हजार, 20 दिवसासाठी 20 हजार रुपये तर 30 दिवसासाठी 30 हजार रुपये राहील. 5001 कि.ग्रा. पेक्षा जास्त 10 दिवसासाठी 15 हजार रुपये तर 20 दिवसासाठी 30 हजार, 30 दिवसासाठी 45 हजार रुपये राहील.
येथे क्लिक करा - राष्ट्रीय युवा संघटनेचे दिल्लीत आंदोलन, काय आहे कारण?
जड मालवाहू वाहनासाठी
जड मालवाहू वाहनासाठी 5000 कि.ग्रा. पर्यंत 10 दिवसासाठी निलंबनाऐवजी सहमत शुल्क 20 हजार 20 दिवसासाठी 40 हजार 30 दिवसासाठी 60 हजार राहील. 5001 कि.ग्रा. पेक्षा जास्तपर्यंत 10 दिवसासाठी निलंबनाऐवजी सहमत शुल्क 25 हजार रुपये तर 20 दिवसासाठी 50 हजार रुपये तर 30 दिवसासाठी 75 हजार रुपये राहील.
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले
राज्यात जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी स्वादिष्ट, सुंगधित तंबाखू, स्वादिष्ट सुपारी, अपमिश्रके युक्त उत्पादित चघळण्यासाठी तंबाखू, खर्रा, मावा, गुटखा, पानमसाला व इतर तत्सम पदार्थ वाहतूक करणा-या वाहनांवर व परवान्यावर मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 नुसार विभागीय कारवाई करण्यात येईल व सदर वाहन जप्त करुन पुढील कारवाईसाठी पोलिस विभागाकडे देण्यात येणार आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.