file photo 
नांदेड

नांदेड शहरासह जिल्ह्यात १२ ते २१ मार्च अंशत: लॉकडाऊन, अत्यावश्‍यक सेवा राहणार सुरू…

प्रल्हाद कांबळे

नांदेड ः गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण याला लोकांनी पाहिजे तसा प्रतिसाद द्यावा. परिणामी शहरात कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढली. त्यामुळे आता १२ ते २१ मार्चपर्यंत अंशत:  लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटणकर यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे कळविले आहे.

या लॉकडाऊनदरम्यान शहरातील आठवडी बाजार, कोचींग क्लासेस, धार्मीक, सामाजीक व राजकिय कार्यक्रम पुर्णत: बंद राहणार. अनेक कार्यालयांमध्ये मार्च एन्डींगची कामे सुरु आहेत. त्यामुळे ही कार्यालये पूर्णतः बंद करता येणार नाहीत. माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र बाळगून शहरात वावर करता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात दारु विक्रीची दुकाने सकाळी सात ते रात्री आठपर्यंत तर किचन व होमडीलीव्हीरी सुरु राहणार. या काळात लसीकरण सुरु राहणार आहे. लसीकरणासाठी काही सेंटर शहर आणि जिल्ह्यात आहेत. 

नांदेड शहर आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सर्व लोकप्रतिनिधींनी लसीकरणासाठी योगदान द्यावे. लसीकरणासाठी लोकांना जाण्यायेण्यासाठी व्यवस्था करावी. जेणेकरुन लोक केवळ लसीकरण केंद्रावर येतील आणि तेथूनच घरी परत जातील आणि शहरात इतरत्र फिरु शकणार नाहीत. भाजीपाला, किराणा दुकाने, डोळ्यांचे दवाखाने, चष्म्यांची दुकाने, मटण, मासे, चिकन, अंडी विक्रीची दुकाने सकाळई सात ते सायंकाळी सात पर्यंत सुरु राहतील. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी वायुवेग पथक निर्माण करण्यात आले आहेत. 
नांदेड शहरासह सह काही ग्रामिण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर पूर्णतः बंदी राहील. विनामास्क फिरणाऱ्यांवरही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. कठोरपणे १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दिवसांत रुग्णांची संख्या कमी झाली, तर लॉकडाऊन उठवू. नाही तर पुढेही वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल.

गृहविलगीकरणात पाठवलेले लोक आपल्या घरात न राहता फिरताना आढळले तर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. ज्यांच्या घरी राहण्याची सोय नाही, त्यांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. प्रत्येक घरी भाजीपाला, किराणा, दूध दररोज लागते. या गरजांची पूर्तता करण्यात येईल. पण लोकांना मुक्तपणे फिरण्यावर पूर्णपणे निर्बंध राहतील. पोलिस आणि मनपाला तशा सूचना दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT