नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय 
नांदेड

नांदेडला महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साधेपणाने होणार

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा महाराष्ट्र दिनाचा शुक्रवारी (ता. एक मे) होणारा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. नांदेडला देखील साधेपणाने कार्यक्रम होणार असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन होणार आहे. 

कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्‍ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. एक मे) साधेपणाने कार्यक्रम होणार आहे.

काय आहेत आदेश
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन समारंभ ता. एक मे रोजी होणार आहे. मात्र, कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा. गो. गायकवाड यांनी काढले आहेत. याबाबतच्या आदेशाची प्रत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली आहे. त्यावरुन नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी देखील तसे आदेश काढून सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी पाठवले आहेत.  

नांदेडला सकाळी आठ वाजता ध्वजवंदन
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवारी (ता. एक मे) सकाळी आठ वाजता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. या ठिकाणी केवळ पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इतर ठिकाणी कार्यक्रम नाही
त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालय येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमास इतर अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये. त्याचबरोबर शासनाच्या संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय वगळता नांदेड जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रम करण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी काढल्या आहेत.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात ओवेसींच्या सभेत गोंधळ, चेंगराचेंगरीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

India ODI Matches in 2026: विराट कोहली - रोहित शर्मा २०२६ मध्ये १८ वनडे सामने खेळणार? भारतीय संघाचे वर्षभराचे वेळापत्रक जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 05 जानेवारी 2026

मोठी बातमी! महापालिकेच्या मतदानाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’ची मुदत संपली, आता ‘या’ लाडक्या बहिणींनाच संधी, वाचा...

Crispy Matar Cutlets Recipe: घरीच बनवा हॉटेलसारखे क्रिस्पी मटार कटलेट, 15 मिनिटांत तयार होईल ही सुपर टेस्टी रेसिपी

SCROLL FOR NEXT