maharashtra folk art jagran gondhal still alive sakal media
नांदेड

महाराष्ट्राची लोककला गोंधळ आजही जिवंत

कलेला मिळावा राजाश्रय; संबळ आणि तुणतुणे वाद्याचा वापर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये कीर्तन आणि तमाशा यानंतर गोंधळ या लोककलेला विशेष महत्त्व आहे. शेकडो वर्षाची ही लोककला आजही जिवंत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये गोंधळ कलाप्रकार प्राचीन काळापासून लोककलेमध्ये मोडला जातो.

महाराष्ट्रामध्ये दुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा प्राचिन काळापासून आजतागायत सर्वत्र जिवंत असल्याचे बघायला मिळते. महाराष्ट्रातील गोंधळी समाजाच्या वतीने ही लोककला आजही जोपासल्या जात आहे. आजही बहुतांश समाजामध्ये कोणतेही शुभ काम, कार्य करण्याच्या अगोदर आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे.

गोंधळी समाजाचे हे लोककलाकार अंगात झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवीची प्रतिमा व कवड्याची माळ अशा वेशभूषेत हे गोंधळी आंबा मातेचा जयजयकार करीत संबळ आणि तुणतुणे या पारंपरिक वाद्याच्या साहाय्याने दारोदार फिरून ही लोककला सादर करायचे. हा लोकविधी सादर करताना सांबळाच्या तालावर लोकगीतं सादर करून नृत्य सुद्धा करायचे त्यामुळे लोकांना विशेष आनंद होत होता. पुढे कालांतराने या लोककलेचे महत्त्व कमी झाले किंवा अलीकडच्या काळामध्ये अनेक मनोरंजनाची साधने निर्माण झाल्याने ही पारंपारिक लोककला आधुनिक युगामध्ये लोप पावत असल्याचे दिसून येते. मात्र, आजही गोंधळी समाजाच्या वतीने ही लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केल्या जातो.

गोंधळी कलेला राजाश्रय मिळावा

या लोककलेमध्ये वापरण्यात येणारी वाद्य संबळ आणि तुणतुणे ही सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आजच्या नवीन पिढीला या वाद्यांचा परिचय सुद्धा उरला नाही. महाराष्ट्रातील शेकडो वर्षाची ही लोककला, संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी या कलेला राजाश्रय मिळणे तितकेच गरजेचे आहे. आजही हे कलावंत उपेक्षिताचे जिने जगत आहेत. त्यामुळे शासन स्तरावरून व सामाजिक स्तरावरून महाराष्ट्रातील या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे तितकेच गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: अभिषेक शर्मा - शुभमन गिलच्या वादळाने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; भारताचा सुपर फोरमध्ये पहिला विजय

IND vs PAK, Video: सुर्यकुमार यादवचा जुगाड! 'गार्डन'मध्ये फिरणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाला चतुराईने केले बाद

IND vs PAK Video: दोनदा चूक झाली, पण तिसऱ्यांदा अफलातून कॅच घेत अभिषेक शर्माची गर्जना; आक्रमक खेळणारा सैम आयुब कसा झाला आऊट?

Pune: गोधड्या धुण्यासाठी गेले, पाण्यात अनेकजण अडकले, तरुणांनी धाडस दाखवलं अन्...; खडकवासलातील थरारक प्रसंग

IIM Centre: 'आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात';राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मंजुरी; २०२६ पासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार

SCROLL FOR NEXT