File photo 
नांदेड

कोरोना इफेक्ट : वेटरसह मॅनेजरचेही कुटुंब पडले उघड्यावर

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनामुळे २३ मार्चपासून संपूर्ण राज्यात बारबंदी करण्यात आली. परवानाधारक देशी व विदेशी बार यांना सील लागले. कोरोनाला रोखण्यासाठी घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु, याच व्यवसायात कित्येक वर्षापासून वेटरपासून मॅनेजरपर्यंत कार्यरत कामगारांच्या घरावर वीज कोसळल्यागत अवस्था झाली आहे. तथापी, रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता कामगारांमधून जोर धरू लागली आहे.

बारबंदीमुळे शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कुटुंबप्रमुखच या व्यवसायात कार्यरत असल्याने त्यांच्यावर अवलंबून असणारी सदस्यसंख्या शेकडोंच्या घरात आहेत. मद्यविक्री सुरु रहावी, असे कुणालाही वाटणार नाही व त्याचे समर्थनही कुणी करणार नाही. परंतु, याच व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांच्या कुठेतरी विचार व्हायला हवा, असे या कामगारांचे मत आहे.

उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नाहीत
चांगल्या गोष्टीला सुरुवात करण्यासाठी त्याग व त्रास सहन करावाच लागतो. परंतु, ४० वर्षांपासून याच व्यवसायात कार्यरत कामगारावर सात ते आठ सदस्यसंख्या असलेले कुटुंब अवलंबून असल्यास व त्यासाठी पत्नी आजारी, मुलींच्या लग्नाची काळजी, मुलांचे शिक्षण व उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नाही, उतरत्या वयात दुसरे शारीरिक कष्टाचे कामही होऊ शकत नाही. तेव्हा कुटुंबप्रमुखाने अशा अवस्थेत काय करावे? असा प्रश्न बारमधील कामगारांकडून उपस्थित होत आहे.

रोजगार उपलब्ध करून द्यावा
कोणतेही व्यवसाय बंद करताना त्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी रोजगारनिर्मिती करणेही गरजेचे आहे. कारण सामान्यांच्या रोजगाराचा समतोल बिघडला तर अनुचित प्रकार घडायला वेळ लागत नाही, हे लक्षात घेऊन या कामगारांना रोजगार उबलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

कुटुंबच आले उघड्यावर
मी येथील एका बिअरबारमध्ये पंधरा वर्षांपासून मॅनेजर म्हणून काम बघत होतो. पंधरा वर्षात स्वतःचे घर सुद्धा घेऊ शकलो नाही. मला दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम करत आहे. परंतु, लॉकडाउनमुळे बार बंद असल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. कामावर कार्यरत असताना मला मिळणाऱ्या पैशातून कुटुंबातील सर्वांचे जेमतेम नियोजन करत होतो, अशी खंत बालाजी सोनवणे यांनी व्यक्त केली.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

SCROLL FOR NEXT