Nanded Photo 
नांदेड

अनेक अहवाल प्रलंबित, लॅबमधील तांत्रिक अडचणीचे गौडबंगाल काय...?

शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यातील एकुण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २६ रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आले आणि आरोग्य विभागाने लगेच आपलीच पाठ थोपटुन घेत कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने समाधान व्यक्त केले. ही बाब सर्वांनाच दिलासा देणारी असली तरी, कोरोना स्वॅब तपासणी लॅब आणि जिल्हा आरोग्य विभागात कोणताही समन्वय नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. 

दोन दिवसांपूर्वी ३०८ संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीकरिता लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (ता.१५) लॅबमधून एकही अहवाल बाहेर आला नाही. तेव्हा यासाठीच का कोटी रुपये खर्च करुन तातडीने ‘कोरोना’ टेस्टिंग लॅब सुरु केली आहे का? असा सवाल उपस्थित करुन लॅबच्या कामाबद्दल शंका उपस्थित केली जात होती. मात्र, शुक्रवारी रात्री उशिराने ४१ जणांचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ उडाली.

५१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु 

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा शनिवारी (ता.१६) सायंकाळी पावनेपाचच्या दरम्यान परिपत्रक काढुन तांत्रिक अडचण असल्याने ३८० संशयितांचे स्वॅब नमुने अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले. त्यामुळे शुक्रवार प्रमाणेच शनिवारीदेखील एकही स्वॅब अहवाल प्राप्त होणार नाही, असे निश्चित मानले जात आहे. शनिवारी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ८४ वर गेली आहे. तर उपचारादरम्यान पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोना आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २६ इतकी आहे. यातील दोन कोरोना बाधित रुग्ण फरार आहेत. ५१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

तांत्रिक अडचणी म्हणजे नेमके काय?

जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर तत्काळ अहवाल प्राप्त व्हावा व पुणे, औरंगाबादच्या फेऱ्या कमी व्हाव्यात म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात कोरोना विष्णूची चाचणी करण्यासाठी ‘लॅब’ सुरु करण्यात आली. मात्र लॅबमध्ये टेक्निकल अडचणी येत असल्याने स्वॅब नमुने तपासणीसाठी व्हायचा तोच विलंब होत आहे. याला जिम्मेदार कोण? खरच लॅबवर कामाचा तान येत आहे का? टेक्निकली कोणत्या अडचणी आहेत. असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. तर दुसरीकडे मात्र लॅब कधीच बंद नाही. काम सुरु असल्याची माहिती लॅबमधील जिम्मेदार व्यक्तीकडून सांगितली जाते. तेव्हा कोण खरे आणि कोण खोटे या विषयी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.


लॅबमध्ये कुठलीच तांत्रिक अडचण नाही
लॅबमध्ये कुठलीच तांत्रिक अडचण नाही. शुक्रवारी रात्री चार वाजेपर्यंत लॅब सुरु होती. सकाळी आठपासून पुन्हा सुरु आहे. जिल्हा आरोग्य विभागाने काय पत्र दिले माहित नाही. परंतु लॅबमध्ये कुठलीही तांत्रिक अडचण नाही.  
- प्रा. डॉ. जी. बी. झोरे (लॅब इंनचार्ज)


       

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT