maratha reservation protest ardhapur nanded second day update marathi news
maratha reservation protest ardhapur nanded second day update marathi news sakal
नांदेड

Maratha Reservation : अर्धापुरात सलग दुसऱ्या दिवशी आरक्षणाच्या मागणीसाठी जलभरो आंदोलन

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर : तालुक्यातील विविध गावांमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला तातडीने ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.मालेगाव परिसरातील शेकडो नागरिकांनी स्वतःला अटक करून घेतले.पोलीस ठाण्याच्या परिस घोषणांनी दुमदुमून गेला.या आंदोलनात महिलांचा सहभाग खूप मोठा होता.

अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव, गणपूर,येळेगाव, मालेगाव,शाहपूर, कोंढा, आदी गावांतील तरुणांनी मराठा समाजाला तातडीने ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.पार्डी येथे कॅडल मार्च काढुन आरक्षणाची मागणी केली.

पोलिस ठाण्यात येऊन नागरिक, महिला आबालवृद्धांनी ठिय्या आंदोलन केले.पोलीस ठाणे परिसरात एक मराठा लाख मराठा,जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हाक्काचे, अटक करा अटक करा आम्हाला अटक करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार उज्वला पांगरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचायत समिती कार्यालय परिसरात घोषणाबाजी करण्यात आली.

शेलगाव येथे आतम राजेगोरे, ऋषीकेश राजेगोरे मालेगावात प्रल्हाद इंगोले, ईश्वर पाटील इंगोले, प्रमोद इंगोले , सावरगाव अंजनाबाई आबादार,माधव जाधव, गोविंद आबादार,श्रीधर आंबोरे, कोंढ्यात कपील कोंढेकर, गजानन लबडे, आदी गावांतील तरुणांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT