नांदेड

..अन् होम क्वारंटाइनचा शिक्का घेऊन नवरी निघाली सासरी

स्मिता कानिंदे


गोकुंदा, (ता.किनवट, जि. नांदेड) ः लॉकडाउनचे सर्व नियम पाळून झालेल्या विवाहानंतर नवरीला घेऊन जाणाऱ्या नवरदेवास उनकेश्वर येथील नाक्यावर आरोग्य पथकाने थांबवून नवदांपत्याची वैद्यकीय तपासणीनंतर होम क्वारंटाइन करूनच जिल्हा सीमेबाहेर जाण्याची परवानगी दिली. तळहातावर मेहंदी व वरून होम क्वारंटाइनचा शिक्का घेऊन नवरी सासरी निघाली. तपासणीनंतरच नवदांपत्याने जिल्हासीमा ओलांडल्याचे हे चित्र दिसून आले मराठवाडा -विदर्भ सीमा असलेल्या पैनगंगा तिरावरील किनवट तालुक्यातील उनकेश्वर नाक्यावर.


लॉकडाउनमध्ये बुधवारी (ता. सहा) करंजी (ता. माहूर) येथे फक्त नवरी आणि नवरदेवाचे आई-वडील यांच्या उपस्थितीत जया तुळशिराम चौधरी (नवरी) व विकास पुंडलिक गौऊत्रे (नवरदेव) यांचा आदर्श विवाह झाला. त्यानंतर वर - वधूला आपल्या नागेझरी (ता. घाटंजी, जि. यवतमाळ) या गावी नेण्यासाठी रवाना झाले. 

जात असताना उनकेश्वर चेकनाका (पोस्ट) येथे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पोलिस पथकासह वैद्यकीय पथक २४ तास येथे तैनात केले आहे. येथे नवदांपत्य येताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखालील प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी (बाजार) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा शेख, आरोग्य सेवक एस. एस. वंजारे, व पोलिस स्टेशन मांडवीचे पोलिस कॉस्टेबल आर.सी. खरोडे यांच्या पथकाने फिजिकल डिस्टनसिंग ठेवून त्यांची थर्मल स्कॅनर तपासणी, तसेच कोरोना विषयी तपासणी, चौकशी व मार्गदर्शन करून होम क्वारंटाइन करून सीमेबाहेर सोडले. तळहातावर मेहंदी व मनगटावर होम क्वारंटाइनचा शिक्का घेऊन नवरी निघाली सासरी नांदायला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT