nanded nanded
नांदेड

Crime News: नांदेडमध्ये विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

उपचारासाठी नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला

सकाळ वृत्तसेवा

उपचारासाठी नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला

नांदेड: सासरच्या मंडळींनी छळ केल्याने एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली तसेच जिल्ह्यात विवाहितेच्या छळाच्या दोन घटना घडल्या असून सासरच्या मंडळीविरूद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळकी बाजार (ता. हदगाव) येथील जयश्री काशीनाथ पोपलवाड (वय ३२) या विवाहितेला सासरची मंडळी शारिरिक व मानसिक त्रास देत होती. ट्रॅक्टरचे पैसे देण्यासाठी माहेराहून पैसे आण म्हणून तिचा छळ करण्यात येत होता. शेवटी या त्रासाला कंटाळून तिने विष प्राशन केले.

तिला उपचारासाठी नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याबाबत अशोक लक्ष्मण दामनवाड (वय ५२, रा. जवळा खुर्द, तानूर, जि. निर्मल, तेलंगणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार विठुबोने करत आहेत.

शहरालगत असलेल्या वाजेगाव आणि खोजा कॉलनी इस्लामपूर, निजामाबाद येथे २२ वर्षीय महिलेला संगनमत करून सासरची मंडळी शारिरिक व मानसिक त्रास देत होती. हॉटेल सुरू करण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये, म्हणून तिला शिवागीळ करून मारहाण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Mobile Price Hike : 10 हजारांचा स्मार्टफोन आता 20 हजारला? मोबाईल कंपन्यांचा 'तो' सिक्रेट खेळ, जो हळू हळू रिकामा करतोय तुमचा खिसा

Bakri Eid: बकऱ्याचा अजब 'डाएट प्लॅन'! रोज २५० ग्रॅम चिकन आणि कोल्ड्रिंक; AC त राहणाऱ्या काश्मिरी बकऱ्याची गोष्ट

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

SCROLL FOR NEXT